Video : दादांचं निधन तरी, वर्धापनदिनाचे कार्यक्रम; चहूबाजूंनी टीकेची झोड उठताच पुणे पालिकेला उपरती
अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री होते, त्याच पुणे पालिकेने अशी असंवेदनशिलता दाखवावी असे म्हणत अनेक स्तरातून यावर टीका करण्यात आली होती.
Naval Kishor Ram On PMC Anniversary Program : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप महाराष्ट्र सावरलेला नाहीये, असे असताना पुणे पालिकेने वर्धापनदिनानिमित्त विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याबाबतचे पत्रकही काढले होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनाला 10 दिवसही होत नाही तोच वर्धापनदिनानिमित्त प्रशासनाकडून गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर हे सर्व रंगारंग कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे.
अजित पवारांच्या निधनाने महापालिका प्रशासन देखील अस्वस्थ झाले आहे.यावर्षी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा प्रश्नच येत नाही, वर्धापनदिन कुठलाही कार्यक्रम घेतला जाणार नाही, अस स्पष्टीकरण पालिका आयुक्त यांनी दिलं आहे. याबाबत महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क उपायुक्त तुषार बाबर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिल्याचेही सांगितले जात आहे.
अजित पवारांचं निधन, बॅनर-फटाक्यांबाबत भाजपचा मोठा निर्णय! तुरुंगातून आंदेकर सासू-सुनाही येणार
पालिका प्रशासनाकडून वर्धापनदिनानिमित्त वैयक्तिक आणि समूहनृत्य, नाटक, हिंदी आणि मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री होते, त्याच पुणे महानगरपालिकेने अशी असंवेदनशिलता दाखवावी असे म्हणत अनेक स्तरातून यावर टीका करण्यात आली होती. अखेर वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
अजितदादांच्या मृत्यूच्या दु:खादरम्यान पुणे मनपाचा अजब निर्णय; चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग #PMC #ajithpawar @mohol_murlidhar @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/Ej3jzdYvxw
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 6, 2026
