मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू

Urmila Kothare Car Accident : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, कांदिवलीत मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात कांदिवली पूर्व (Kandivali East) परिसरात झाला आहे.
माहितीनुसार, कांदिवली पूर्व परिसरात उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं त्यात एका मजुराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. तसेच अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. उर्मिला शूटिंग संपवून कारमधून घरी जात असताना वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली. असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. तर या अपघातामध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
‘पंकुताई संतोषच्या घरी का नाही गेला’? मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल
तर दुसरीकडे तब्बल 12 वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेने छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. ती नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.