बाप्पाचे आभार! अपघातातून बचावल्यानंतर उर्मिलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

बाप्पाचे आभार! अपघातातून बचावल्यानंतर उर्मिलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Actress Urmila Kothare Social Media Post : अभिनेत्री उर्मिला कोठारेचा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपघात झाला होता. यावर आता उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाप्पाचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये उर्मिला (Urmila Kothare) गणपती बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत (Car Accident) आहे. उर्मिलाने भीषण अपघातातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानल्याचं दिसतंय.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये उर्मिलाने म्हटलंय की, 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास माझा गंभीर कार अपघात झाला. पोईसर मेट्रो स्टेशनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचे काम सुरू ( Urmila Kothare Accident) होते. तेव्हा मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर उभी होती. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. अचानक वळण आले, त्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.

बायकोकडे काय बघत बसता? रविवारी काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T कंपनीच्या चेअरमनची सॅलरी 51 कोटी

या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मुंबई पोलिस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार. त्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात हलवले. मी आता घरी आहे. मला अजूनही त्रास होत आहे. पाठीला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झालीय. डॉक्टरांनी मला किमान 4 आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kanetkar (@urmilakothare)

बाप्पाचे आभार. हे कितीही वाईट असू शकतं, असं देखील उर्मिलाने म्हटलंय. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार. ज्यांनी काळजी केली. मी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. हा एक गंभीर अपघात होता. माझ्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल, असं देखील उर्मिलाने म्हटलंय.

VIDEO : ‘बाप बाहेर आलाय…’ येरवड्यातून सुटल्यावर भाईची जंगी रॅली, पोलिसांनी दिला मोठा दणका

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातात गंभीर जखमी झालीय. या अपघातात त्यांच्या कारने दोन मजुरांना धडक दिली. या धडकेनंतर एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात उर्मिलाला देखील दुखापत झाली होती. आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्वत: उर्मिलाने दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube