Pune Car Accident : “हो, ते रक्त माझेच”, कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाच्या आईची कबुली

Pune Car Accident : “हो, ते रक्त माझेच”, कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाच्या आईची कबुली

Pune Accident : पु्ण्यातील कल्याणीनगर येथील अपाघात प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या घेण्यात आलेला रक्ताचा नमुना कुणाचा अशी चर्चा रंगली होती. हा रक्ताचा नमुना कुणाचा याचं उत्तर मिळालं आहे. हे रक्त अल्पवयीन मुलाच्या आईनेच दिल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेतले होते. या चौकशीत रक्त नमुना आपलाच असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता याची कबुलीही आई वडिलांनी दिली आहे.

19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कारने एका दुचाकीला जबर धडक दिली होती. त्यात दोघांना मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या वडील आणि आजोबांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक

मुलाची आई आणि वडील या दोघांनी मिळून हा कट रचला होता असेही आता स्पष्ट होत आहे. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयात उपस्थित होते. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये विशाल अग्रवाल दिसत होता असेही आता समोर आले आहे. पोलीस चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचा वेगाने उलगडा होत चालला आहे.

दरम्यान, अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील, आई आणि मुलाचे आजोबा या सगळ्यांनाच अटक झाली आहे. अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. काल त्याची आई शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिल्यानंतर बदललेले रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे होते असा संशय पोलिसांना होती. याबाबत चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पुणे अपघात प्रकरणी आयुक्तांना फोन केला होत का? अजित पवारांनी थेटच सांगितल

रक्ताचे नमुने बदलल्याचं प्रकरण

हा गंभीर अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनीच एका तरुणाचं रॅप साँग मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. त्यावेळी हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगत ढसाढसा रडल्या होत्या. त्यावेळीही मुलाचे वडिल, आजोबा चर्चेत असताना मुलाची आई म्हणजे शिवानी अग्रवालही मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर लगेच रक्ताचे नमुने बदलल्याचं प्रकरण समोर आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube