Pune Accident : कार चालकाला धमकावलं! विशाल अग्रवाल पुन्हा पोलिस कोठडीत, न्यायालयाकडून परवानगी

Pune Accident : कार चालकाला धमकावलं! विशाल अग्रवाल पुन्हा पोलिस कोठडीत, न्यायालयाकडून परवानगी

Pune Accident : आपल्या अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणीला कारने चिरडल्याप्रकरणी (Pune Accident) अटकेत असलेल्या बिल्डर अग्रवालची (Vishal Agrawal) पुणे पोलिसांना कोठडी मिळालीयं. या अपघाताप्रकरणी वाहन चालकाला धमकावून डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल अग्रवालची कोठडी मागितली होती. अखेर आज न्यायालयाने पोलिसांनी परवानगी दिली असून विशाल अग्रवालला पोलिस येरवडा कारागृहातून ताब्यात घेणार आहेत.

पवार धादांत खोट बोलले, कोणीही नवखं, अनुभवी नव्हतं; ‘त्या’ वक्तव्यावरून अजितदादांनी सुनावलं

पुण्यातील अपघातानंतर कार चालकाला धमकी देऊन जबाब देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला. याआधी आजोबा सुरेंद्र अग्रवालची चौकशी झाली होती. या चौकशीत अल्पवयीन मुलाला चावी दिल्याची कबुली त्यांनी दिली होती. नातू अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये; भुजबळांनी हत्यार उपसतं टाकली ठिणगी

कल्याणी नगर अपघात प्रकरणात चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपची आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी अग्रवाल यांच्या बाजूने वकिलांना जोरदार युक्तीवाद केला. तसेच पुण्यात अपघात झाला त्यावेळी मी दिल्लीत होतो असे सुरेंद्र अग्रवाल यांना सांगितले, तसेच मी दिल्लीत असतानाच पोलीस घरातला डीव्हिआर घेऊन गेले. मात्र, घरातल्या सीसीटीव्हीसोबत छेडछाड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणी विशाल अग्रवाल याची पोलिसांना कोठडी मिळालीयं.

पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांनी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. या कमिटीच्या निर्णयानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनस्थळी भेट देऊनही कंट्रोल रूमशी संपर्क केला नसल्याने क्राईम पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

दरम्यान, 19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज