पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक

Pune car accident case : पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Pune Police) या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune car accident) ब्लड सँपल बदलण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आहे. (Shivani Agrawal) याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. दरम्यान, शिवानी अग्रवाल यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ट्विट : https://x.com/ANI/status/1796730183971664225?t=T0rG5v9r77xrx7nFWK8REw&s=19

अनेक प्रश्नांची होणार चौकशी

कार चालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्या प्रकरणात सध्या दोन डॉक्टर आणि एक शिपाई अटकेत आहे. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलले असले तरी ते कुणाचे आहेत याचा शोध घेतला असात ते एका महिलेचे आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक वेग-वेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी मुलाच्या आईवर संशय आल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला. या काळात मुलाची आई शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेत अखेर पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना अटक केली आहे. आता त्यांच्याकडून जे रक्त दिलं गेलं ते कुणाचं होत? अग्रवाल यांचं आहे का? त्यांनी कुणावर दबाव आणला का? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा यांच्या चौकशीदरम्यान होऊ शकतो.

रक्ताचे नमुने बदलल्याचं प्रकरण

हा गंभीर अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनीच एका तरुणाचं रॅप साँग मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. त्यावेळी हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगत ढसाढसा रडल्या होत्या. त्यावेळीही मुलाचे वडिल, आजोबा चर्चेत असताना मुलाची आई म्हणजे शिवानी अग्रवालही मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर लगेच रक्ताचे नमुने बदलल्याचं प्रकरण समोर आलं होतं.

Porsche Car Accident : पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार, बाल न्याय मंडळाने दिली परवानगी

घटना काय घडली होती?

कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी सुमारे 160 किमीच्या वेगाने पोर्श कार चालवली. त्यामध्ये अपघात होऊन अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अनिशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच, मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघंही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज