Kalyani Nagar Car Accident मधील Porsche कार गुगल ट्रेंडमध्ये टॉपला; प्रकरण नेमकं काय?
Porsche Car on top in Google Trend of Kalyani Nagar Car Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे च्या पहाटे दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं.. या प्रकरणी अलिशान पोर्शे (Porsche) गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. मात्र अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता बारचे मालक, मॅनजरसह याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अपघातामध्ये हा मुलगा चालवत असलेली पोर्शे गाडी सध्या गुगल ट्रेंडमध्ये ( Google Trend ) टॉपला आली आहे.
Pune Accident News : ट्रकचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? राहुल गांधी संतापले
कल्याणी नगरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकीवर चाललेल्या तरुण-तरुणीला उडवलं. त्यावेळी हा मुलगा अलिशान आणि अत्यंत महागडी असलेली पोर्शे ही गाडी चालवत होता. त्यामुळे या अपघाताच्या बातम्यांमध्ये ही गाडी चर्चेचा विषय ठरली. तर गुगलवर या अपघाताबद्दल माहिती शोधताना लोकांकडून पोर्शे हा कीवर्ड सर्वात जास्त शोधला गेला. त्यामुळे पोर्शे गाडी सध्या गुगल ट्रेंडमध्ये टॉपला आली आहे.
गुगल ट्रेंड म्हणजे काय?
सामान्यत: गुगल ट्रेंडमध्ये गुगल आणि युट्युबवर शोधले गेलेले लोकप्रिय कीवर्ड आलेखानुसार त्यांच्या कमी जास्त प्रमाणात दाखवले जातात. त्यासाठी गुगलकडून डेमोग्राफ त्याच बरोबर विविध क्षेत्रातील ट्रेडिंग वर्ड आठवडा, दिवस आणि तासानुसार दाखवला जातात. त्या संबंधित बातम्या आणि माहिती त्या ट्रेंडवर गेल्यानंतर वाचकांना पाहायला मिळतात.
पुण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
तर कल्याणीनगरच्या अपघातातील पोर्शे कारबद्दल सांगायचं झालं तर या अपघातात कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरूणाला कार देणारे त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना आलिशान गाड्यांचा प्रचंड शौक आहे. यातीलच एक गाडी म्हणजे कोट्यावधींची किंमत असलेली पोर्शे. याच कारने अग्रवाल यांच्या मुलाने दोघांचा जीव घेतला.