पुण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Shortage Of CNG Gas In Pune : पुणे शहरात (Pune City) गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी गॅस (CNG Gas) पाइपलाइन तांत्रिक दुरुस्तीमुळे बंद असल्याने गॅससाठी सीएनजी पंपावर वाहण्याच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात गॅस पुरवठा होत नसल्याने याचा सर्वात मोठा फटका रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसला आहे. गॅस भरण्यासाठी सध्या सीएनजी पंपावर रिक्षा आणि टॅक्सींच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. गॅस भरण्यासाठी सीएनजी पंपावर लागलेल्या रांगामुळे पंपावरील मनुष्यबळावर प्रचंड ताण पडत आहे तर दुसरीकडे सीएनजीसाठी लागलेल्या रांगा वाहतुकीस अडथळा ठरत आहे. यामुळे लवकरात लवकर पुणे शहरात गॅस पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ध्रुव रुपारेल म्हणाले की, MNGL आणि टोरेंट गॅस यांनी या समस्येचे निराकरण कधी होणार याबाबात माहिती दिलेली नाही. यामुळे या टंचाईचा केवळ प्रवाशांवरच परिणाम झाला नाही तर CNG पंप अटेंडंटवरही अतिरिक्त दबाव आला आहे.
मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती
गॅस पुरवठादारांकडून वेळेवर काही अपडेट न मिळाल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे आणि कमी किमतीमध्ये जास्त मायलेज मिळत असल्याने अनेकजण आता सीएनजी गाड्या खरेदी करताना दिसत आहे.