पुण्यातील गंभीर घटना! रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला घेतला चावा; अंगठा तुटला

पुण्यातील गंभीर घटना! रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला घेतला चावा; अंगठा तुटला

Pune Crime : कशावरून वाद होईल आणि तो किती टोकाला जाईल याचा काही नेम नाही. पुण्यात अशीच घटना घडली आहे. दुचाकी पुढे नेताना रिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराचा वाद झाला. यामध्ये दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचा रिक्षा चालाकाने चावा घेतला. तो इताका जोराचा चावा घेताल की पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा भाग तुटूनच पडला. पुण्यातील रविवार पेठेत ही घटना घडली आहे.

 

पुण्यात मोठा अपघात! अल्पवयीन कारचालकाने दुचाकीला उडवलं, मित्र-मैत्रिणीचा जागीच मृत्यू

खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

या घटनेत रिक्षा चालक गणेश सोमनाथ भुसावळकर (वय ६०, रा. हेरंब काशीनाथ सोसायटी, धनकवडी, बालाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर खंडू बेंद्रे (वय ६६, रा. अयोध्यानगरी, प्रगतीनगर, बोपोडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्ञानेश्वर बेंद्रे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. ते रविवार पेठेतून पत्नीसह दुचाकीवरुन निघाले होते. रविवार पेठेत गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी ते आले होते.

 

खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

रविवार पेठेतील राजहंस मेटल दुकानासमोरून बेंद्रे यांनी दुचाकी काढली. त्यावेळी रिक्षाचालक गणेश भुसावळकरला थांबावे लागले. या कारणावरून आरोपी भुसावळकरने बेंद्रे यांना शिवीगाळ केली. ‘पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’ असं भुसावळकर त्यांना म्हणाला. बेंद्रे यांनी त्याला जाब विचारला. आरोपीने त्यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली. त्याच दरम्यान, बेंद्रे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला रिक्षाचालक भुसावळकर याने जोरात चावा घेतला. त्यामध्ये बेंद्रे यांच्या c. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज