Donald Trump यांच्या 5 चुका, ज्यामुळे अमेरिका इराणसोबतच्या युद्धात अडकला

Donald Trump : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस असून आतापर्यंत या युद्धात 17 हजार पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

Donald Trump

Donald Trump : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस असून आतापर्यंत या युद्धात 17 हजार पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. तर अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या संयुक्त कारवाईला इराणकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

सौदी अरेबिया आणि इतर मित्र देशांनी इराणविरुद्ध अमेरिकेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. तसेच युरोपीय राष्ट्रे आणि नाटोने देखील अमेरिकेला इराणविरुद्ध पाठिंबा दिला नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. या युद्धाच्या सुरुवातीला आपल्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने इराणचा पराभव होईल अशी अपेक्षा होती मात्र 18 दिवसांनंतर आता त्यांना त्यांच्याच चुकीच्या अंदाजांचे परिणाम भोगावे लागत आहेत. या युद्धाच्या पहिल्या दिवशीच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह 40 वरिष्ठ लष्करी कमांडर मारल्या गेल्यानंतर देखील इराणची स्थिती या युद्धात भक्कम दिसून येत आहे.

ट्रम्प या युद्धात कसे अडकले?

युद्धाबाबतचा चुकीचा अंदाज

द डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या संघर्षाचे स्वरूप समजून घेण्यात चूक केली. सुरुवातीला, ट्रम्प यांना असे वाटले होते की, इराणवर हवाई हल्ला केल्यास तिथे सत्तापरिवर्तन घडून येईल मात्र, इराणी समाजाची गुंतागुंतीची आणि “विविध घटकांनी बनलेली  रचना पाहून ट्रम्प यांच्या आशा धुळीस मिळाल्या. इराणसोबतचा हा संघर्ष आता दीर्घकाळ चालणारा विषय बनला आहे. युद्धावर वर्चस्व मिळवण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कदाचित जमिनीवरील लष्करी तुकड्या (भूदल) तैनात करण्यास भाग पडेल आणि ही एक अत्यंत जोखीमपूर्ण चाल ठरू शकते.

ट्रम्प इराणमध्ये भूदल तैनात करण्याची जोखीम पत्करतील याची शक्यता कमीच आहे कारण अशा कृतीतून निर्णायक फायदा मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

गुप्तचर अहवालांकडे दुर्लक्ष

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी सीआयए (CIA) या गुप्तचर संस्थेने ट्रम्प यांच्यासमोर दोन अहवाल सादर केले होते. एका अहवालात स्पष्टपणे नमूद केले होते की, केवळ हवाई मोहीम राबवल्याने इराणमध्ये सत्तापरिवर्तन घडून येणार नाही. दुसऱ्या अहवालात असा इशारा देण्यात आला होता की, अशा प्रकारच्या कारवायांमुळे उलट त्या राजवटीची सत्ता आणि पकड अधिकच मजबूत होऊ शकते.

या गुप्तचर विश्लेषणांमध्ये अशीही सावधगिरी वर्तवण्यात आली होती की, जर इराणचे सध्याचे सरकार या हल्ल्यातून बचावले, तर ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) ही संघटना पुन्हा एकदा एक प्रबळ शक्ती म्हणून उदयास येऊ शकते आणि ही परिस्थिती अमेरिकेच्या हितासाठी एक गंभीर धोका ठरू शकते. ट्रम्प यांनी या सर्व गुप्तचर निष्कर्षांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला.

अरब मित्रराष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्यात अपयश

इराणविरुद्ध आक्रमक मोहीम हाती घेताना, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या अरब मित्रराष्ट्रांचा पाठिंबा आणि सहभाग मिळवण्यात अपयश आले. कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी या संदर्भात आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. नियोजित चर्चेच्या अवघ्या दोन दिवस आधी अमेरिका इराणवर हल्ला कसा करू शकते, असा प्रश्न ओमानने उपस्थित केला. नेमक्या याच कारणामुळे, इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेला अरब राष्ट्रांचा पाठिंबा मिळवता आला नाही. खुद्द ट्रम्प यांनीच मंगळवारी या गोष्टीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. यावेळी ते अरब देशांवर स्पष्टपणे नाराज असल्याचे दिसून आले.

युद्धाबाबतची हास्यास्पद विधाने

युद्धा सुरू होताच, अमेरिकेला त्यात मोठा फायदा झाला.  अगदी पहिल्याच दिवशी अमेरिकेने इराणच्या 40 प्रमुख कमांडरना मारले. यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही समावेश होता. त्यानंतर, ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांसमोर विधाने करण्यास सुरुवात केली. अशाच एका विधानात, ट्रम्प यांनी तर असे सुचवले की, हे हल्ले केवळ सैनिक “मजा करत” आहेत म्हणून केले जात आहेत. युद्धनौका बुडवण्याबाबतही ट्रम्प यांनी अशाच प्रकारे बेजबाबदार विधाने केली ज्यामुळे अमेरिकेला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

युद्धविरामाबाबतचा संभ्रम

मोजतबा खामेनी यांची नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर, इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयाचा जागतिक तेल व्यापारावर त्वरित परिणाम झाला. जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार कोसळले.

थकबाकीवरून मीटर काढायला आल्यास चोर समजून प्रसाद देणार…, मनसेचा महावितरणला इशारा

या घडामोडींनंतर, ट्रम्प यांनी काही वेळा युद्ध संपवण्याबाबत विधाने केली, तर दुसऱ्याच दिवशी हा संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे ठामपणे सांगितले. परिणामी, या संघर्षात सहभागी असलेल्या कोणत्याही राष्ट्राचा सध्या ट्रम्प यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.

follow us