पुण्यात मोठा अपघात! अल्पवयीन कारचालकाने दुचाकीला उडवलं, मित्र-मैत्रिणीचा जागीच मृत्यू

पुण्यात मोठा अपघात! अल्पवयीन कारचालकाने दुचाकीला उडवलं, मित्र-मैत्रिणीचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मोठा अपघात झाला आहे. भरधाव गाडीने चिरडल्याने दोन तरुणांना जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. पार्टी करून जात असलेल्या तरुणाने भरधाव गाडी चालवली ज्यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली असून, कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील गंभीर घटना! रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला घेतला चावा; अंगठा तुटला

पाठीमागून जोरात धडक दिली

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्याच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीने भरधाव वेगाने अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास करत आहेत.

 

उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा

या अपघातानंतर मध्यरात्री घटलेला हा प्रकार पाहून कल्याणी नगर परिसरातील नागरिकांनी तेथे एकच गर्दी केली होती. तसंच, सतरा वर्षीय भरधाव कारचालक असलेल्या मुलाला चांगलाच चोप दिला. कारचालक पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सतरा वर्षीय मुलगा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दोघांचा नाहक जीव गेला

मृत्यू झालेला अनिस दोन दिवसांपूर्वीच बाहेर देशातून पुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव चालक हा फक्त सतरा वर्षांचा आहे. त्यात परवाना नसताना तो पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला. दरम्यान, कुण्या शौकीन लोकांमुळे आणखी किती लोकांचा हकनाक बळी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube