पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Bail granted to Avinash Bhosle : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मोठा दिलासा मिळाला. भोसले यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात R Madhavan ची जादू; 7000 लोकांनी दिलं अनोखं त्रिब्युट!
भोसले हे गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. अविनाश भोसले यांच्यावर अनियमित कर्ज दिल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अविनाश भोसले यांना दिलासा दिला आहे.
पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
हायकोर्टाने शुक्रवारी आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. उच्च न्यायालयाने अविनाश भोसले यांना परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली. तसेच तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन वर्षापूर्वी छापेमारी करून अटक…
वर्षभरापूर्वी सीबीआयने भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. त्याचवेळी ईडीने त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावरही फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर 30 एप्रिल 2022 रोजी ‘सीबीआय’ने भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर छापा टाकला. त्यानंतर 26 मे 2022 रोजी भोसले यांना अटक करण्यात आली.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांची रिअल इस्टेट किंग म्हणूनही ओळख आहे. भोसले हे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.