सेंट्रल बॅंक इंडियामध्ये नोकरीची संधी, महिन्याला 45 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
Central Bank of India Bharti 2024 : आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, आज स्पर्धा इतकी आहे की, नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) नुकतीच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सेंट्रल बॅंक अंतर्गत सल्लागार (Consultant (Retired Officer)) पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारकी काय? शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.
नेपाळमध्येही मसाल्यांवर संकट! MDH-एव्हरेस्ट मसाले विक्री अन् वापर बंद
सल्लागार (निवृत्त अधिकारी) या पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 मे 2024 पासून सुरूवात झाली आहे.
रिक्त पदांचा तपशील –
सल्लागार (निवृत्त अधिकारी) पदासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
वयोमर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षे असावे.
उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वेतन या विषयी जाणून घेण्यासाठी अधिसूचना तपासावी.
Ground Report : जानकर की बंडू जाधव, परभणीचा ‘बॉस’ कोण? जातीच्या मुद्द्यावर फिरली होती निवडणूक…
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून त्याची प्रिंट काढून तो ऑफलाइन सबमिट करायचा आहे. व त्यांच अर्ज खालील पत्य्यावर पाठवायचे आहेत.
पत्ता – महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, सेंट्रल ऑफिस, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021.
अधिकृत संकेतस्थळ-
https://www.centralbankofindia.co.in/
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 मे 2024
पगार –
ग्रामीण क्षेत्र – 25,000
शहरी क्षेत्र – 35,000
मेट्रो क्षेत्र – 45,000
अधिसूचना-
https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/Empanelment-of-Retired-Officers-of-Central-Bank-of-India-for-engagement-as-an-advisor-in-Regional-Offices-Zonal-Offices-and-various-department-in-Centra.pdf
इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. महत्वाची बाब अशी की, उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले किंवा चुकीचे माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळं या पदभरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.