बॅंकेत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, Apply Online

बॅंकेत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी!  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, Apply Online

बँकेमध्ये जॉब करण्याचं अनेक तरुणांचं ध्येय असतं. मात्र देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नोकरी मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागेत. जर तुम्ही देखील सरकारी जॉब मिळवण्याची तयारी करत असाल, आणि बँकेत नोकरी करू इच्छित असाल, तर तुम्च्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पदवीधारक उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. अप्रेंटिसच्या (शिकाऊ) एकूण 5000 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरतीद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवार हे या भरतीसाठी online पद्धतीने अर्ज करू शकतात. 20 मार्च 2023 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 एप्रिल 2023 हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. Centralbankofindia.co.in.अधिकृत वेबसाइटवर या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली असून त्यात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार आदी सविस्तर माहिती दिली आहे.

पदाचे नाव-
बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर

रिक्त जागा तपशील
एकूण जागा- 5,000
ओबीसी प्रवर्ग- 1,162
एससी – 763
एसटी – 416
ईडब्ल्यूएस – 500
सर्वसाधारण – 2159

शैक्षणिक पात्रता
पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदवीधारकांसाठी ही उत्तम नोकरीची संधी. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. भरतीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे.

नीतू घंघासने ‘महिला जागतिक बॉक्सिंग’ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित

किती पगार मिळेल?
ज्या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल, त्यानुसार त्याला वेतना मिलणार आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात नोकरी करणाऱ्यांना 10,000 रुपये प्राथमिक मासिक वेतन मिळणार आहे. शहरी भागात निवड झालेल्या उमेदवारांना 15 हजार रुपये वेकन दिले जाणार आहेत. तर मेट्रो शहरातील शाखेत निवड झालेल्यांना दरमहा 20,000 रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रियेची माहिती
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी केवळ onlineअर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होईल. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये विभागली गेली आहे. भरतीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागेल. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. लेखी परीक्षा पास केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यातून त्यांची निवड केली जाईल.

अर्जाचा फी –
आरक्षित श्रेणीतील उमेदवार आणि महिला उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जासोबत 600 रुपये भरावे लागतील. आणि PWD उमेदवारांकडून 400 रुपये फी आकारले जाणार आहे. आणि अन्य सगळ्या उमेदवारांना अर्जासाठी 800 रुपये फी आहे.

अर्ज कसा करायचा-
सर्वप्रथम उमेदवारांनी Centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर जाऊन Recruitments या पर्यायावर क्लिक करा. वर क्लिक करा.

– त्यानंतर नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

– आता अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरा.

– त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

– आता अर्ज फी सबमिट करा.

– सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.centralbankofindia.co.in/en/recruitments

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube