BMC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 60 हजार रुपये पगार
BMC Bharti 2024: आज प्रत्येकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. ती म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (Brihanmumbai Municipal Corporation) लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये काही रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती? याच विषयी जाणून घेऊ.
मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
ही पदे पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांची भरती मुलाखतीद्वारे होणार आहे. दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनानंक 21 ऑगस्ट 2024 आहे.
रिक्त पदे – एकूण 05 पदे
पदांचा तपशील –
वैद्यकीय अधिकारी – 01
स्टाफ नर्स – 02
सपोर्ट स्टाफ – 01
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक – 01
शैक्षणिक पात्रता-
वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस पदवी
स्टाफ नर्स – GNM/बेसिक B.Sc नर्सिंग/MSc नर्सिंग
सपोर्ट स्टाफ- 10वी पास
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी, B.Sc होम सायन्स अॅंड न्युट्रिशन, B.Sc नर्सिंग.
पाकिस्तान भारतात विलीन होणार? भाजप नेत्याने केली मोठी भविष्यवाणी
पगार
वैद्यकीय अधिकारी- 60,000/- प्रति महिना
स्टाफ नर्स- 20000/- दरमहा
सपोर्ट स्टाफ – 15500/- प्रति महिना
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक – 40,000/- प्रति महिना
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सायन, मुंबई
अधिकृत वेबसाइट – https://www.mcgm.gov.in/
अधिसूचना –
https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/CLMC%20%26%20NRC%20Advertisement%20%26%20Application%20form.pdf
ऑफलाइन अर्ज कसा पाठवावा?
1. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज मिळवा.
2, सर्व आवश्यक माहिती देऊन अर्ज पूर्णपणे भरा.
3 दिलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करा.