मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.

Asha Parekh

Maharashtra News : चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंनी (Sudhir Mungantiwar) ट्विट करत या पुरस्कारांची माहिती दिली आहे. चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणारे पु्रस्कार जाहीर करत आहोत. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना आणि स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करत आहोत.

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023 लेखक, दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023 ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Devendra Fadnavis: स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट प्रेरणा देणारा;फडणवीसांकडून स्तुतीसुमने

follow us