डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह आठ डॉक्टरांचे राजीनामे

डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह आठ डॉक्टरांचे राजीनामे

प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी
देशातील प्रसिद्ध आणि रुग्णाचे आशास्थान असलेल्या जेजे रुग्णालयात आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी आपली सेवा थांबवली आहे. जेजेच्या डीन पल्लवी सापळे यांच्या जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लहाने यांचे २००९ पासून जेजेवर एकछत्री अंमल होता. जेजेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्ववाद उफाळून येतो. यापूर्वी डॉ. लहाने विरुद्ध डॉ अशोक आंनद, डॉ. मेडेकर आणि डॉक्टर पल्लवी सापळे हे वाद चंगलेच गाजले होते. अनेक वेळा हा वाद कोर्टात तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे नेला. तर काही जणांची रवानगी ही थेट जेजे बाहेर करण्यात आली होती.

डॉ. लहाने यांचे राजकिय संबंध आणि सामाजिक वजन याविषयी कमालीचा दरारा जेजे रुग्णालयात होता. त्यांची शिस्त आणि कडक नियमनाविरोधात चार वर्षांपूर्वी नेत्र विभागाचे ३०० डॉक्टर यांनी लहाने यांच्या विरोधात बंड पुकारला होता.

MLA Rohit Pawar : अहमदनगरच्या नामांतराचं राजकारण करु नका…

यावेळी न्यायमूर्ती डागा यांची समिती बसविण्यात आली होती . त्याच पद्धतीने आता आंदोलन सुरू झाले आहे.डीनपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लहाने यांची डेप्युटी डायरेक्टर, सल्लागार अशा पदावर वर्णी लागली होती. पल्लवी सापळे यांची दोन वर्षांपूर्वी जेजे डीन म्हणून वर्णी लागणार होती. त्यावेळी त्यांना कोविड काळात विशेष जबाबदारी म्हणून धुळे येथे पाठवण्यात आले. त्याच ठिकाणी त्याना डीन म्हणून जबाबदारी देण्यात आली. या सर्वांमागे डॉ. लहाने असल्याची चर्चा त्यावेळी जेजेमध्ये जोरात सुरू होती. हा वाद सुरूच राहिल्याने जेजेमध्ये मोठे दोन गट पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

कालांतराने हा वाद निवाळला. पल्लवी सापळे जेजेच्या डीन झाल्या. लहाने यांच्या गटातील डॉक्टर यांची चौकशी सुरू झाली. लहाने यांचा मुलगा, सून तसेच नेत्र विभागाच्या प्रमुख रागिनी पारेख यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला होता. यात डॉक्टर लहाने यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.


गिरीश महाजन यांनी वरदहस्त काढला

गेल्या दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यामुळे डॉ. लहाने यांना सेवेत विशेष पद निर्माण करण्यात आले होते. गिरीश महाजन यांच्या काळात राज्यभर होणाऱ्या कँपमध्ये लहाने यांनी महात्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी लहाने, गिरीश महाजन हे एक समन्वयाचे सूत्र झाले होते. गिरीश महाजन यांनी कायम लहाने यांना झुकते माप दिले होते. आता पल्लवी सापळे यांच्यात वादात लहाने यांनी तक्रारी करुन देखील महाजन यांनी लक्ष दिल नसल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube