MLA Rohit Pawar : अहमदनगरच्या नामांतराचं राजकारण करु नका…
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचं राजकारण करु नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडमधील चौंडीत साजरी करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच नामांतर अहिल्यादेवी होळकर असं करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा
आमदार रोहित पवार म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण नामांतर आम्ही केलं, असं भासवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. नामांतराच्या मुद्द्याचं राजकारण कुणीही करु नये, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..
तसेच अहमनगरच्या नामांतरास बारामतीतील वैद्यकीय कॉलेज आता अहिल्यादेवी होळकर नावाने ओळखलं जाणार आहे. या निर्णयाचंही रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी अहमदनगरसाठी सरकारी रुग्णालय, शासकीय कॉलेज मंजूर करुन त्या रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं असतं तर अधिक आनंद, स्वागत केलं असतं, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार पवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावरुन दिली आहे.
महिला आयोगाची दिल्ली पोलीसांना नोटीस, पीडित मुलीची ओळख उघड कशी झाली?
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवला आहे. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यानगर नामांतरावर भाष्य करत करत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरुन राज्य सरकारकडूनही अहिल्यानगर नामांतराला मंजुरी मिळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.