नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..

नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..

Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत विचारले. त्यावर पाटील म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तुम्हाला महाराष्ट्र सदनात चालत नाही. तो पुतळा बाजूला करण्याचं पाप तुम्ही करू शकता. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काहीच कारण नाही.

पडळकरांनी मागणी केली अन् शासन निर्णयच धडकला; बारामती मेडिकल कॉलेजचे नाव…

नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर नाव देण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे जाहीर करून टाकले.

यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती मेडिकल कॉलेजलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारनेही ही मागणी मान्य करत तत्काळ शासन आदेशही प्रसिद्ध केला. फक्त एकाच दिवसात ही कार्यवाही करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube