नवी मालिका सुरू होण्याआधी अभिनेत्री अक्षया नाईक पोहचली त्र्यंबकेश्वरला

अँड टीव्हीच्या आगामी "हे भगवान कितना बदल गया इनसान" या नव्या कोऱ्या मालिकेत अक्षया मुख्य भूमिकेत झळकणार आहे

News Photo   2026 03 02T140424.101

कुठला ही नवीन प्रवास असला की देवाचं नाव घेऊन (Film) नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची आपल्याकडे पद्धत आहे अनेक अनेक कलाकार प्रत्येक नवीन प्रोजेक्टची सुरुवात ही वेगवेगळ्या पद्धतीने करताना बघायला मिळत. अश्यातच अभिनेत्री अक्षया नाईक ने नुकतंच त्र्यंबकेश्वरला जाऊन तिच्या नव्या प्रवासासाठी आशीर्वाद घेतले आहे आणि ती लवकरच पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर झळकणार आहे.

दीपिकाच्या होळी सॉन्ग्सचा जलवा कायम: ‘बलम पिचकारी’ ते ‘बेशरम रंग’

अँड टीव्हीच्या आगामी “हे भगवान कितना बदल गया इनसान” या नव्या कोऱ्या मालिकेत अक्षया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सोशल मीडिया वर पोस्ट करत छान कॅप्शन लिहून तिने म्हटलं ” देवाचा आशीर्वाद घेऊन आणि आईची सुंदर साडी नेसून केलेलं हे देवदर्शन नवी सकारात्मक ऊर्जा देणार आहे आणि मी माझ्या नव्या प्रवासाची आणि नव्या भूमिकेची सुरुवात करत आहे.

स्वप्नांची नागरी असलेल्या मुंबईत नव्या मालिकेचा श्री गणेशा होतोय आणि हा आनंद ही नवी संधी माझ्यासाठी खूप खास आहे” नेटफ्लिक्सच्या तस्करी मधून स्वाती साळुंखे ने ओटीटी विश्वात दमदार धुमाकूळ घातला आणि आता प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. अभिनयाच्या सोबतीने अक्षया क्लाउनिंग सारख्या कलेमधून देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असताना तिला पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

follow us