महिला आयोगाची दिल्ली पोलीसांना नोटीस, पीडित मुलीची ओळख उघड कशी झाली?

महिला आयोगाची दिल्ली पोलीसांना नोटीस, पीडित मुलीची ओळख उघड कशी झाली?

Wrestlers Protest: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन पीडितेची ओळख उघड केल्यावरुन दिल्ली पोलिसांना समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचा काका म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी संबंधित कागदपत्रे पत्रकारांसमोर ठेवली होती. यामध्ये त्या व्यक्तीने आरोप करणारी मुलगी अल्पवयीन नसल्याचा दावा केला होता.

याबाबत स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी ट्विट केले की, “बृजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काका असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्या मुलीची ओळख उघड करणारी कागदपत्रे प्रेसमध्ये दिसली. मी पोलिसांना नोटीस देत आहे. POCSO विरुद्ध FIR झाली पाहिजे.” स्वाती मालीवाल यांनी प्रश्न केला की, पीडितेवर दबाव टाकण्यासाठी ब्रिजभूषणला मोकळे सोडले आहे का?

खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 पदांची मेगा भरती, 69 हजार रुपये मिळणार पगार

महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. यामध्ये एक एफआयआर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये पॉक्सो कायदा लागू करण्यात आला आहे, तर दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube