‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा
25 villages in Yavatmal will go to Telangana state : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद (Maharashtra-Karnataka border dispute) पेटल्याने सोलापूर जिल्ह्यातील 18 गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांनाही सीमेला लागून असलेल्या तेलंगणा (Telangana) राज्यात जाण्याची तयारी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळील 25 गावे तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत. दिग्रस येथील पूल आणि तेलंगणातील परिवहन सेवा मिळत असल्यानं या नागरिकांना आदिलाबादची बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळं ही गावे तेलंगणात जायचा विचार करत आहे. दरम्यान, याविषयी या गावातील नागरिकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, तेलंगणा सरकार ज्या सुविधा तिथल्या शेतकरी वर्गाला देते, त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी कुठल्याही योजना राबवत नाही. शेतकरी हिताचे निर्णय राबवण्यात सरकार कमी पडते. त्यामुळं विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. पिकांना भाव नाही. पिकांचं काही नुकसान झालं तर कुठली मदत मिळत नाही.
कर्नाटक मंत्रिमंडळात फेरबदल, मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाकडे मोठी जबाबदारी
नागिरकांनी सांगितलं की, विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा आत्महत्या झाल्यास तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देते, त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार 1 लाख रुपये देते. पण ते मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागते .
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीजपुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ, शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 कर्ज रुपयांपर्यंत दिला जातो. या तुलनेत महाराष्ट्र सरकार काही देत नाही. त्यामुळं आम्ही तेलंगणात जाण्याच्या तयारी आहोत, असं सांगितल्या जात आहे.
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात महाराष्ट्र राज्याची सीमा पैनगंगा नदीवर संपते आणि नदीच्या पलीकडे तेलंगणाची सीमा सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्याच्या सीमेजवळील पिंपळखुटी गावाच्या पाचशे मीटर वर तेलंगणातील डोलारा गाव आहे. केसीआर सरकार तेलंगणातील डोलारा गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी चोवीस तास वीज पुरवते. त्यामुळं ही गावे तेलंगणाच्या प्रेमात आहेत.