सुधीर मुनगंटीवारांना ‘ते’ विधान भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली दखल…
Sudhir Mungantiwar : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच चंद्रपुरात भाजपकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) उपस्थितीत भाजपची सभा पार पडली. या सभेत बोलताना चंद्रपूर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केलीयं. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार जाताच आम्ही दखल घेतली असल्याचं प्रत्युत्तर निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
रात्री साडेबारा वाजता शिवतारेंना फोन,अजित पवार म्हणाले, हृदयात कुठेतरी दुखतं …
सुधीर मुनंगटीवार नेमकं काय म्हणाले होते?
1984 साली शीख दंगल घडली होती. त्यावेळी एका सख्ख्या भावाला त्याच्या बहिणीसोबत कपडे उतरुन खाटेवर झोपवणारे काँग्रेसवाले असल्याची सडकून टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. तसेच देशाचे तुकडे करण्याची भाषा, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे, दृष्टीकरणाचे राजकारण करणारे काँग्रेसवाले असल्याचंही ते म्हणाले होते.
राज्यात मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा नवीन हवामान अंदाज
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाईची मागणी करीत निवडणूक आयोगाला टॅग केली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून याच पोस्टची दखल घेण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार? याकडं लक्ष लागलं आहे.
Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !
सचिन सावंत यांनी पोस्टमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करीत म्हणाले, निवडणूक आयोगाने तत्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, तऱ्हेची विषारी भाषा खपवून घेतली जाऊ नये, एका भावाला बहिणीबरोबर सारखे भयंकर आरोप मुनगंटीवार यांनी केले आहेत. त्यांचा हरण्याच्या भीतीमुळे तोल ढळला असल्याचंही सचिन सावंत म्हणाले.