Sanjay Dutt: लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? संजय दत्त स्पष्टच म्हणाला…
Sanjay Dutt Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अरुण गोविल (Arun Govil) यांसारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीमध्ये संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
आता याबद्दल अभिनेता संजय दत्तने प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला की, या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगितले. त्यानुसार मी राजकारणात येत नाहीय. माझी काही इच्छा असेल तर मी स्वत: याविषयी जाहीर करेल. संजय दत्तने X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
“मला राजकारणातील माझ्या सहभागाबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. मला राजकीय क्षेत्रात उतरायचे असेल, तर मी त्याची अधिकृत घोषणा करणारा व्यक्ती असेन. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.”, अशी विनंती अभिनेता संजय दत्तने केला आहे.
संजय दत्त 2009 मध्ये समाजवादी पक्षाचा भागही होता. मात्र आपण काही विशेष करू शकत नाही, असे वाटल्याने त्यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये ते RSP (राष्ट्रीय समाज पक्ष) मध्ये सामील झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी संजय दत्तनेही एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्यांनी राजकारणात येत नसल्याचे सांगितले होते. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते युवा कार्य आणि क्रीडा मंत्रीही होते.
‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या साडी घातलेल्या लुकचा इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर
मात्र, संजय दत्त निवडणूक लढवत नाहीये. तो फक्त चित्रपटातच काम करणार आहे. नुकतचं तो विजयसोबत ‘लिओ’मध्ये दिसला होता. त्याच्या खात्यात आणखी दोन साऊथचे चित्रपट आहेत. पहिला तेलगू चित्रपट ‘डबल स्मार्ट’ आणि दुसरा कन्नड चित्रपट KD द डेव्हिल. अक्षय कुमारसोबतचा ‘वेलकम टू जंगल’ही सध्या जोरदार चर्चेत आहे.