पीएम मोदी इव्हीएम नाही ह्वदय हॅक करतात…कंगनाने कॉंग्रेस अन् विरोधकांना सुनावलं
Kangana Ranaut ने भाजपवर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.यामध्ये काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे.
PM Modi hacks hearts, not EVMs… Kangana tells Congress and opposition : दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे.या दरम्यान नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांवरून सत्ताधारी भाजपवर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.यामध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेची खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे.
काय म्हणाली कंगना रनौत?
संसदेत ईव्हीएमच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठलेली असताना कंगनाने राहुल गांधी यांना निशाण्यावर ठेवत म्हटलं की,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएम हॅक करत नाहीत तर ते लोकांची ह्रदयं हॅक करतात.लोक म्हणतात की जुन्या काळामधील मतदानाची प्रक्रिया योग्य होती. मात्र त्यावेळी देखील घोळ केला जात होता.हे लोक मतदान पेट्या घेऊन जात होते.
तसेच कंगना पुढे म्हणाले की,विरोधक प्रत्येक वेळी एसआयआरच्या मुद्द्यावरून गोंधळ घालतात. हे पाहून मन हे लावतं कारण राहुल गांधी,वारंवार खादीमध्ये धागा आणि धाग्यातून कपडा असंच करत राहतात.त्यानंतर ते विदेशी महिलेच्या फोटोवर आले.त्यावर या महिलेनेच भारतात कधीही न आल्याचे स्पष्टीकरण दिले.मात्र तिच्या फोटोंचा काँग्रेसकडून वापर केला गेला.तिच्या वैयक्तिक हक्काचा देखील विचार केला गेला नाही.त्यामुळे मी संसदेची माफी मागते.काँग्रेसला कोणतीही मर्यादा नाही.असं म्हणत यावेळी कंगनाने जोरदार टीकास्त्र सोडलं.
