द राजा साबचा ट्रेलर लॉन्च! प्रभासचा भूतांशी सामना तर संजय दत्तच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ

The Raja Saab tariler Launch करण्यात आला आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. त्यामध्ये प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

Untitle (6)

The Raja Saab tariler Launch Prabhas’s fight with ghosts, Sanjay Dutt’s look captivates the audience : गेल्या काही दिवसांपासून दक्षिणातील सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट द राजा साब चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित ट्रेलर आज मंगळवारी 30 सप्टेंबर 2025 रोजी रिलीज करण्यात आला आहे.

WhatsApp ला पिछाडत नंबर 1 बनलं Arattai, जाणून घ्या ‘अरत्ताई’ शब्दाचा नेमका अर्थ!

हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. त्यामध्ये प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता संजय दत्तच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. साडेतीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रभासची लव्ह स्टोरी, त्याचा असणारा भूतांशी संघर्ष आणि एक रहस्यमय हवेली दाखवण्यात आली आहे. तसेच संजय दत्त हा नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे, या दोघांसह या चित्रपटांमध्ये जरीना वहाब, मालविका मोहन, निधी अग्रवाल, ब्रम्हानंद, बोमन इराणी आणि योगी बाबू यासारखे अभिनेते आणि अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत.

भविष्य घडविणाऱ्या योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धेला मुदतवाढ! ‘या’ दिवशीपर्यंत करा पोस्टर अपलोड

या चित्रपटाचं दिग्दर्शन मारुती यांनी केला आहे त्यांनी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दुसरीकडे बाहुबली चित्रपटानंतर प्रभास हा चाहत्यांना फारसा आकर्षक करू शकलेल्या नाही. त्याचे अनेक चित्रपट अक्षरशः फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे आता त्याच्या या नव्या अवतारामध्ये चाहते त्याला प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://youtu.be/wT4HcYAeV5U?si=DN0Zt0YN0wxOHQUs

पूरग्रस्तांसाठी शिंदेंच्या ‘बॉक्सर’ आमदाराचा मोठा निर्णय! संजय गायकवाडांकडून प्लॉट विकून 25 लाखाची मदत

हा चित्रपट पाच डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये येणार होता. मात्र त्याच दिवशी रणवीर सिंगचा धुरंधर हा चित्रपट रिलीज होत असल्याने राजा साब या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 19 जानेवारी 2026 करण्यात आली आहे.

follow us