Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !

Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !

Raj Thackeray Announced his role for Lok Sabha 2024 : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मला राज्यसभा नको आणि विधानपरिषद नको, जागा वाटपाची वाटाघाटी नको, असेही ठाकरे यांनी जाहीर केले. मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे.

शिवसेनेचा नाही तर मी मनसेचाच अध्यक्ष राहणार; राज ठाकरेंनी ठासूनच सांगितलं

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बिघडलेली असताना आपल्याला यातून पुढे जाण्यासाठी मार्ग काढायचा आहे. मनसे महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवेल. मात्र माझी महाराष्ट्रातील मतदारांना आणि जनतेला ही विनंती आहे की, कृपा करून व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका. जे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळत गेली तर पुढचे दिवस भीषण येतील.

संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक नंबर करतो; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना टोला

त्यामुळे पुढच्या पाच वर्षांचा विचार करता. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला कोणत्याही वाटाघाटी नको. मी त्यांना सांगितलं की, मला राज्यसभा ही नको विधानपरीषद ही नको. पण या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष राज्यातील महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले.

चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

लोकसभा निवडणुकीसाठी जास्त इच्छुक नाहीत. पण ते विधानसभा निवडणुकीत महायुतीत असणार असल्याचे संकेत राज यांनी दिले आहेत. कारण त्यांनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्या या भुमिकेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी मनसेचाच अध्यक्ष राहणारः राज ठाकरे
तसेच यावेळी मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) अध्यक्ष राहणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठासून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज