संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक नंबर करतो; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना टोला

संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक नंबर करतो; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना टोला

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांविरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि त्यांची बहिण सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले की, संसदेत भाषणं करून मतदारसंघाची कामं होत नाहीत.

चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

आजच्या भाषणात अजितदादा म्हणाले की, सध्या बारामतीमध्ये मत मागण्याची पातळी सोडण्यात आली आहे. या अगोदर या पातळीवरती बारामतीकरांना मतांची मागणी केली जात नव्हती. लोकांना भावनिक केलं जातंय, चुकीचं काहीतरी सांगितलं जातंय. मात्र नुसते संसदेत भाषणं करून बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत. भाषणंच करायची असतील तर मी देखील एक नंबर आहे. माझी पट्टी लागली तर मी ही चांगली भाषणं करतो. पण मी भाषणंही करतो आणि कामही करतो. मी विकासाला निधी आणतो. एखादं काम वाजवून करून घेतो. असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देत त्यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट

दरम्यान काही दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघांमध्ये नागरिकांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून टीका केली होती की, संसदेत जायचं म्हणजे तिथे भाषणं करावे लागतात. तिथे नवऱ्याला प्रवेश नसतो. त्याला केवळ पर्स घेऊन संसदेच्या कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. असं म्हणत सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून अजितदादा आणि त्यांच्या पत्नीवर टीका केली होती. त्यावरच अजितदादांनी आज प्रत्युत्तर दिलं.

Ankita Lokhande : स्वातंत्रवीर सावरकरनंतर अंकिता लोखंडे दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये…

त्याचबरोबर याच सभेत अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं. ते म्हणाले की, 1991 ला तुम्ही लेकाला म्हणजे मला खासदार केलं. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना ही निवडून दिलं. त्यानंतर लेकीला म्हणजेच सुप्रियालाही तीन वेळा खासदार केलं. आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या. म्हणजे सगळी फिटम -फाट होईल. म्हणजे वडील, लेक आणि सूनपण खुश होईल. तसेच तुम्हीही खुश व्हाल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज