Supriya Sule : ‘बडे लोग बडी बातें’; हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरुन हसन मुश्रीफांवर सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule : ‘बडे लोग बडी बातें’; हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरुन हसन मुश्रीफांवर सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार नाही, असं विधान केलं. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Government Schemes : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

खासदार सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, मोठे लोक मोठ्या गोष्टी करतात. मोठ्या लोकांनाच हेलिकॉप्टर होतात. त्यामुळे मोठे लोकं, धनवान लोकं हे हेलिकॉप्टर वापरतात. अनेक नेतेमंडळी हेलिकॉप्टर हे वेळ वाचवण्यासाठी करतात, हे माहिती होतं, पण आता मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर फेऱ्या मारणार आहेत.

Bihar News : तेजस्वी यादव जोमात! निवडणुकीधीच व्हीआयपी-राजदची नवी इनिंग

एखाद्या पक्षाला मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर परवडत असेल तर याबद्दल मला वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रश्न विचारला पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. एखाद्या उमेदवाराला जर मतदारांना इथं तिथं नेण्यासाठी हेलिकॉप्टर परवडत असेल तर याची इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी झाली पाहिजे. कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की, एवढे पैसे आले कुठून? असाही सवाल यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

एवढं डिमॉनिटायझेशन झालं आहे. नोटबंदी झाली आहे. मग एवढे पैसे आले कुठून असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत, पण हे खूप चिंताचनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी सांगेल की, इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडी या सगळ्यांचीच टेस्ट लावा, कारण महाराष्ट्रातील मंत्री काय बोलताहेत? हे खूप चिंताजनक आहे. पण मोठे लोकं मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण काय बोलणार असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरु झाली आहे. महायुतीमधील तिनही पक्षांचे नेते प्रचारासाठी बारामतीमध्ये येऊ लागले आहेत.

त्याच्यात नुकतीच इंदापूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळावा घेतला. यावेळी फडणवीस यांनी 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ भाषण केलं पण त्यामध्ये त्यांनी एकदाही सुनेत्रा पवार यांना निवडून द्या असा म्हणाले नाही, असा सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यांचा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube