जागावाटपावरून महायुतीत खटके! शिवसेनाला २३ जागा मिळाव्यात, अन् धनुष्यबाण चिन्हावरच…; संजय मंडलिकांचे विधान

  • Written By: Published:
जागावाटपावरून महायुतीत खटके! शिवसेनाला २३ जागा मिळाव्यात, अन् धनुष्यबाण चिन्हावरच…; संजय मंडलिकांचे विधान

Sanjay Mandalik : कोल्हापूरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदा संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) जाणार असल्यचाची चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतानाच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचं ते म्हणाले. कोल्हापूलोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या चिन्हावरही लढावे लागणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीर संजय मंडलिक यांनी खुलासा करतांना धनुष्यबाण चिन्हावरच लढणार असल्याचं म्हटलं.

अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल देशपांडे म्हणतात… 

आज माध्यमांशी बोलतांना संजय मंडलिक म्हणाले की, गेल्या वेळी शिवसेनेने २३ जागांवर उमेदवार दिले होते. त्यामुळं २३ जागा आम्हाला मिळाव्यात. २०१९ ला आमचे १८ खासदार निवडून आले होते. त्यातील शिंदे गटाला १३ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. निवडून आलेल्या १८ जागांवर तर आमचे उमेदवार असावेत, असा आमचा आग्रह आहे. शिवाय, जेवढ्या जागा आम्ही लढल्या होत्या, त्या २३ जागांवरही आमचे उमेदवार असावेत, असं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडी मागणी केली. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत, त्या ठिकाणाहून लढतील, असं मंडलिक म्हणाले.

तुलना कुणाशी करायची याचं भान ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला 

पुढं बोलतांना मंडलिक म्हणाले की, आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढवू. दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगतिल ह्या केवळ अफवा आहेत. आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह असतांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढण्यचाा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले.

सध्या संजय मंडलिक आणि अमित शाह यांच्या गुप्त भेटीची चर्चा होतेय. त्यावरही मंडलिक यांनी अमित शाहांच्या खुलासा केला. ते म्हणाले की, अमित शाह यांना मी पक्षप्रवेश केा त्यावेळी भेटलो होता. त्यानंतर कधीही भेटलो नाही. शिंदे साहेब हे आमच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळं अन्य कोणाला भेटलो नसल्याचा निर्वाळा मंडलिक यांनी दिला.

श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत विचारले असता मंडलिक म्हणाले की, शाहू महाराज लोकसभेचे उमेदवार असतील असे मला वाटत नाही. जे वृत्त माध्यमातून समोर येते, त्यावर विश्वास ठेवू नका. तरीही ते उमेदवार असतील तर आमचे वडीलकीचे नातं बदलणार नाही. ही निवडणूक दोन पक्षातील विचारांवरच होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube