अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल देशपांडे म्हणतात…

  • Written By: Last Updated:
अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल देशपांडे म्हणतात…

Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे ( Rahul Deshpande On Amaltash Movie ) हे केवळ त्यांच्या शास्त्रीय संगीत गायनासाठी ओळखले जात नाहीत तर अभिनय, निर्मिती या क्षेत्रातही त्यांनी आपलं कौशल्य आजमावलं आहे. त्याचंचं उदाहरण म्हणजे आता पुन्हा राहुल देशपांडे एका अनोख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अमलताश’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने देशपांडे यांच्याशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाबद्दल खास माहिती दिली.

तुलना कुणाशी करायची याचं भान ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला

यावेळी बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, आपण एकदा असं समजतो की, आपण खूप व्यस्त आहोत इतरांना आपण वेळ देऊ शकत नाही. मात्र याचं कारण देखील आपण नक्की सांगू शकत नाही. मात्र हा चित्रपट तुम्हाला एक मोठा श्वास घ्यायला शिकवेल. त्यात तुम्हाला तुमचं मेडिटेशन झाल्याचे देखील जाणवेल. या चित्रपटात देखील राहुलच्या भूमिकेचे नाव राहुलच आहे. जो एक रॉकस्टार असून त्याचा कॉलेजमध्ये बँड असतो.

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल

त्याच्या आयुष्यामध्ये त्याची बहीण, भाची मित्र आणि गाणं हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. या पात्राचं एवढंच विश्वासल्याने त्याच्याकडे एक समाधान आहे. त्यामुळे त्याला जगासमोर स्वतःला फार देखावा करण्याची गरज पडत नाही किंवा सोशल मीडिया सारख्या माध्यमातून इतरांना माझ्याकडे काय आहे? हे दाखवण्याची आवश्यकता वाटत नाही. अशाच प्रकारचं समाधान आपण देखील आपल्या आयुष्यात शोधत असतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शांत करून जाणार आहे. असा हा चित्रपट आणि राहुलचं पात्र असल्याचं स्वतः राहुलने सांगितलं.

Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाण पुल…

हा चित्रपट आयुष्य कसं जगायला पाहिजे हे शिकवतो? नाती कशी जपायला पाहिजे हे शिकवतो? तसेच स्वतःसाठी गाणं म्हणजे काय? हे देखील हा चित्रपट तुम्हाला नक्की शिकून जातो. राहुल देशपांडे असो किंवा चित्रपटातील इतर कलाकार यातील अनेक जण स्वतः गायक असल्याने त्यांनी चित्रपटातील गाणी स्वतः गायले आहेत.

गुड न्यूज! देशाच्या जीडीपीमध्ये वाढ, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

या सिनेमात गायक राहुल देशपांडे हे मराठी सिनेमातील कथा ही संगीतामधून पुढे घेऊन जात असल्याचे पाहायला मिळणार आहे. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यामध्ये एक परदेशी मुलगी आल्याचं दिसणार आहे, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचं ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या नेमक्या कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

राहुल देशपांडे या चित्रपटात एका अनोख्या अंदाजात दिसत आहेत. या सिनेमात सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज