‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल

Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale ) हीला वादग्रस्त वक्तव्य करणं महागात पडलं आहे. कारण तिच्या बीडमधील कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाण पुल…

धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी परळीतील प्रेमनाथ जगतकर यांनी फिर्याद दिली यावरून परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये केतकी चितळे आणि परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर धर्माधिकारी म्हणाले की, केतकीचं वक्तव्य हे अन्य समाज बांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखंच व्यक्तिगत मतप्रदर्शन होत. समाजाच्या व्यासपीठावरून असे अनेक मतांतर व्यक्त होतात.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळीतील राज्यस्तरीय ब्राम्हण ऐक्य परिषदेला संबोधित करत असतांना केतकी म्हणाली की, गेल्या पाच वर्षात किती ॲट्रॉसिटी दाखल झाल्या आहेत? ब्राम्हणांच्या विरोधात किती केसेस दाखल केल्या गेल्या? याची आरटीआयमधून माहिती मागवा. तुम्हाला हा आकडा पाहून धक्का बसेल. कारण हे अख्खं रॅकेट आहे.

गुड न्यूज! देशाच्या जीडीपीमध्ये वाढ, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

ती पुढं म्हणाली, हे रॅकेट असून यात बरेच वकिल आहेत. एका वकिलाने गेल्या १५ ते २० वर्षात ६२ ॲट्रॉसिटी केसेसे टाकल्या. मी त्या वकिलांचं नाव घेऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर कायम एकच विटनेस असतो. त्याने अलीकडेच दादरच्या एका टिसीवर ॲट्रॉसिटीची केस टाकली. कारण लोकलने प्रवास करत असताना टीसीने थांबवलं. तिकिट भरायला सांगितललं. तर त्याने जात बघून मला अडवलं अशी ॲट्रॉसिटीची केस टाकली. हा फक्त एक वकील आहेत. असे अनेक वकील आहे. अॅट्रॉसिटी हा साईड बिजनेस असून ते मोठं रॅकेट आहे, असं केतकी म्हणाली.

याआधी केतकीने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता ॲट्रॉसिटी हा साईड बिजनेस असल्याचं वक्तव्य करत तिने एका समाजालाच लक्ष्य केलं. त्यामुळं आता वादग्रस्त वक्तव्य करणं केतकीला चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube