Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale Comment On Maratha Protest: शांततेत सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन (Maratha Protest) गेल्या दोन दिवसांपासून हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये दोन आमदारांची घरे जाळण्यात आली होती. (Maratha Reservation) अनेक ठिकाणी रस्ता-रोको, दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यामुळे चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. यावरून राज्य सरकारनेही उपद्रवींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) देखील याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 Ketaki Chitale Post

Ketaki Chitale Post

केतकीने फेसबुकवर याबाबत पोस्ट लिहिली आहे. इन्स्टावरील एक व्हिडीओ शेअर करत केतकीने एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? असा जाब विचारला आहे. इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, परंतु भारताला युनिफॉर्म सिव्हील लॉ आणि युनिफॉर्म क्रमिनल लॉची गरज आहे, असे ती यावेळी म्हणाली आहे.

सोबतच राज्य सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय मिळणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? असेही केतकीने मराठा आंदोलकांना सवाल केला आहे.

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार

तसेच गेल्या चार दिवसापूर्वी केतकीने या दोन कायद्यांची पोस्ट केली होती. आम्ही नव श्रीमंत नाही, त्यामुळे पैशाचा माज नाही. आम्ही दोनशे वर्षाअगोदर जसे जगत होतो, आजच्या देखील तसेच जगत आहोत, त्यामुळे दोनशे वर्ष आणि आज यातील फरक दिसणार नाही. स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा नंतर आमच्या बाजूने कायदा कधीच नव्हता, त्यामुळे त्याचे आजिबात कौतुक नाही. खरी मायनॉरिटी असून आम्हाला फुकट सुखसुविधा नकोय, त्यामुळे आम्ही भिकारी नाही, असे ती यावेळी म्हणाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube