गुड न्यूज! देशाच्या जीडीपीमध्ये वाढ, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

  • Written By: Published:
गुड न्यूज! देशाच्या जीडीपीमध्ये वाढ, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर

India Q3 GDP Data FY24: जगातील अनेक देशांम्ये मंदीची स्थिती असतांना भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करत आहे. नुकतेच सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल (India Q3 GDP) देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचे आकडे जारी केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढ 8.4 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 4.3 टक्के होता.

Supriya Sule : अतिथी देवो भव: ! मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीत मी स्वागत करणार 

याशिवाय वार्षिक आधारावर, GVA 4.8 टक्क्यांवरून 6.5 टक्के झाला. जानेवारीपर्यंत वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टाच्या 63.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. आठ मूलभूत उद्योगांची वाढ जानेवारीत 3.6 टक्क्यांवर घसरली. पायाभूत उद्योगांच्या उत्पादनात मागील वर्षीच्या याच कालावधीत 9.7 टक्के वाढ झाली होती.

चालू आर्थिक वर्षात (FY 24), नाममात्र GDP वाढीचा दर वार्षिक आधारावर 9.4 टक्क्यांवरून 10.1 टक्के झाला आहे. त्याच वेळी, या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 टक्के होता. अशा स्थितीत जी आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल ते डिसेंबर) वार्षिक आधारावर जीडीपी वाढ 7.3 टक्क्यांवरून 8.2 टक्के झाली आहे. याशिवाय एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जीव्हीए वाढ वार्षिक आधारावर 6.9 टक्क्यांवरून 7.5 टक्के झाली आहे.

अमरावती मतदारसंघावर अडसूळांचा दावा, राणांवर टीकास्त्र, ‘राणा दांम्पत्य म्हणजे, चलती का नाम गाडी…’ 

तिसऱ्या तिमाहीत खाण क्षेत्राचा विकास दर वार्षिक आधारावर 1.4 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मॅन्युफॅक्चरिंगची वाढ -4.8 टक्क्यांवरून 11.6 टक्के (YOY) झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्राच्या वाढीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वार्षिक आधारावर तो 9.5 टक्के राहिला आहे. त्याच वेळी, फार्मा क्षेत्राची वाढ तिसऱ्या तिमाहीत 5.2 टक्क्यांवरून -0.8 टक्के (YOY) वर घसरली आहे.

तिसऱ्या तिमाहीत, औद्योगिक वाढ 0.6 वरून 10.4 टक्के (YOY) पर्यंत वाढली आणि सेवा वाढ वार्षिक आधारावर 7.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घसरली. याशिवाय वार्षिक आधारावर सरकारी खप वाढ 7.1 वरून -3.2 टक्क्यांवर घसरली आहे. भांडवली निर्मिती वाढ पाच टक्क्यांवरून 10.6 टक्के (YOY) झाली आहे. सार्वजनिक प्रशासन, संरक्षण विकास दर वार्षिक आधारावर 7.5 टक्के आहे.

वित्त आणि रिअल इस्टेटची वाढ 7 टक्के (YOY) आहे. तिसऱ्या तिमाहीत व्यापार, हॉटेल, वाहतूक, दूरसंचार वाढ 6.7 टक्के (YOY) आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने जीडीपीच्या अंदाजातही बदल केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 7.6 टक्के राहील.

जीडीपीच्या आकडेवारीवर, पीएम मोदींनी X वर एक पोस्ट केली. त्यात लिहिलं की, ‘२०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ८.४% ची मजबूत जीडीपी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि तिची क्षमता दर्शवते. आमचे प्रयत्न जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी चालूच राहतील, 140 कोटी भारतीयांना चांगले जीवन जगण्यास आणि विकसित भारत घडविण्यास मदत होईल!’

मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन म्हणाले, ‘जीडीपीच्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे खूपच चांगले आहेत. औद्योगिक वाढ चांगली झाली आहे. ग्रामीण FMCG मध्ये खंड वाढ सातत्याने वाढत आहे. अर्थव्यवस्थेत सात टक्के दराने वाढ अपेक्षित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube