Supriya Sule : अतिथी देवो भव: ! मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीत मी स्वागत करणार

Supriya Sule : अतिथी देवो भव: ! मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीत मी स्वागत करणार

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आलेल्या गोविंदबागेतील जेवणाच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी त्यांचे नक्कीच स्वागत करेल. ती माझी नैतिक जबाबदारी असून अतिथी देवो भव: असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे माझ्या घरी जे-जे येतील त्यांचं मी मनापासून स्वागत करेल.

अमरावती मतदारसंघावर अडसूळांचा दावा, राणांवर टीकास्त्र, ‘राणा दांम्पत्य म्हणजे, चलती का नाम गाडी…’

राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. त्या दरम्यान शरद पवारांनी मात्र आपल्या स्टाईलमध्ये खास गुगली टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचे आमंत्रण दिलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोटक यांच्या खासदारकीला सोमय्यांचा खोडा; दोघांच्या वादात आमदाराला लागणार लोकसभेची लॉटरी?

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन मार्च रोजी बारामतीमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यास या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्की जाणार. कारण यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दोन-दोन उपमुख्यमंत्री येणार आहेत. मी त्यांचे नक्कीच स्वागत करेल. ती माझी नैतिक जबाबदारी असून अतिथी देवो भव: असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे माझ्या घरी जे-जे येतील त्यांचं मी मनापासून स्वागत करेल. माझ्यावर भारतीय आणि मराठी संस्कार झाले आहेत. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलत असताना दिली.

दरम्यान या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकांवर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे यांची नावं आहेत. मात्र राज्यसभेचे खासदार असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचे आमंत्रण देत आपल्या स्टाईलमध्ये खास गुगली टाकली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज