Supriya Sule : बावनकुळेंच्या पोटातलं ओठांवर आलं ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी घेरलं
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांच्या वक्तव्यावर चांगला समाचार घेतला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की बावनकुळे यांच्या जे पोटात आहे. ते ओठावर आलं आहे.
Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बावनकुळे म्हणाले आहेत की, गावात गावातील छोटे पक्ष संपवून टाका. याच्याच विरोधात आम्ही लढत आहोत. सातत्याने आम्ही तेच म्हणत आहोत की, ही लोकशाही नाही दडपशाही आहे. तसेच बावनकुळे यांच्या जे मनात आहे. ते ओठांवर आलं आहे. त्याचं मला काहीही आश्चर्य वाटत नाही. आम्ही त्या विरोधात लढतच आहोत. मात्र त्यांच्या मित्र पक्षांनी देखील त्याचा विचार करायला हवा. की बावनकुळे यांचे हे वक्तव्य नेमकं कुणाला उद्देशून होतं? तसेच एनडीएमध्ये जे मित्रपक्ष भाजपच्या जास्त जवळ जातो ते त्याला जास्त त्रास देतात. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
परमबीर सिंग प्रकरणात निलंबित केलेल्या अधिकाऱ्याला प्रमोशन; पराग मणेरे IPS सेवेत
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
भाजपच्या क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक नागपूरमध्ये पार पडली. त्यामध्ये पूर्व विदर्भातील भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांना संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, गाव पातळीवरील जे पक्ष आहेत. त्यातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घ्या आणि कमजोर झालेले पक्षांवर भर द्या. तसेच छोट्या पक्षांना संपवून टाका. असं वादग्रस्त वक्तव्य बावनकुळे यांनी केले. त्यावेळी आता सुप्रिया सुळे यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला आहे.