Germany recession : युरोपातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल…

Germany recession : युरोपातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल…

Germany economic recession : अमेरिकेत अर्थिक मंदीचं सावट असतानाच आता युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत अर्थिक मंदीची चाहुल समजली जात आहे. जीडीपीचे आकडे समोर आल्याने अर्थिक मंदीवर शिक्कामोर्तब झालंय. जर्मनी देशाचा जीडीपी सलग दुसऱ्यांदा तिमाहीत घसरला आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्यावा, शिष्टमंडळ अध्यक्षांच्या भेटीला

यंदाच्या वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ नोंदवण्यात आलीय. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 0.3 टक्क्यांनी घसरलाय. तर 2022 साली चौथ्या तिमाहीतही हा जीडीपी 0.5 टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं होतं. दोन तिमाहीत अर्थव्यवस्था घसरल्यास ती मंदीची चाहुल असल्याचं समजल जातं.

Radhakrishna Vikhe : शिर्डी ते भरवीर समृध्‍दी महामार्ग उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा मानबिंदू

एकंदरीत जर्मनीची अर्थिक परिस्थिती पाहता तिथली सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याचं दिसून येतंय. तिथल्या घरगुती वस्तुंच्या वापरामध्येही चांगलीच घट झाल्याचं दिसून आलं. ही घट जवळपास 1.2 टक्के इतकी झाली आहे. कोरोनानंतर इथली अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी मंदी मात्र, दिसून येत आहे.

The Kerala Story : विरोधानंतरही केरळ स्टोरीची ‘अदा’ पुण्यात आली अन् म्हणाली…

जर्मनीत कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे आणि कामगारांची उपलब्धता अर्थिक अडचणीत भर घालत आहे. 2021 सालच्या शेवटच्या टप्प्यात ही स्थिती सुधारली होती परंतु 2022 च्या आकडेवारीनंतर या सुधारणेच्या आशा धुळीस मिळाल्या असल्याचं दिसून येत असल्याचं जर्मन सेंट्रल बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.

दहा वर्षे जुन्याच निकषांचा आधारे सरकारकडुन आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार

17 मार्चनंतर यू. एस डॉलर 0.3 टक्क्याने वाढून 104.16 वर पोहचले असल्याचं डॅन्सके बॅंकेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे जर्मनीवरील मंदीचे सावट अधिक गडद झाले होते. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत अशी 100 हून अधिक क्षेत्रे होती, जी रशियाला मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवा पुरवत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे इथली अर्थव्यवस्था खोळंबलीय. तर दुसरीकडे जर्मनीचा गॅस पुरवठाही मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धाने येथेही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, अमेरिका आणि जर्मनीतील मंदीचे जगभरात पडसाद उमटणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube