टॅरिफ विरोधकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांची खास योजना! अमेरिकन नागरिकांना देणार प्रत्येकी दीड लाख ‘टॅरिफ डिव्हिडंड’
Donald Trump यांनी टॅरिफला विरोध करणाऱ्यांना खूश करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्रुथ ऑफिशिअलवर माहिती दिली.
Trump’s special plan to please tariff opponents! American citizens will be given a ‘tariff dividend’ of Rs 1.5 lakh each : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. तेव्हापासून त्यांनी अजब निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. ज्यामध्ये त्यांनी टॅरिप लावून अनेक देशांना वेठीस धरलं असताना त्यामध्ये त्यांनी आता टॅरिफला विरोध करणाऱ्यांना खूश करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या ट्रुथ ऑफिशिअल या सोशल मिडिया प्लॅटफॉर्ववर माहिती दिली.
टॅरिफ विरोधकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांची खास योजना!
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/115519726463094783
टॅरिफच्या विरोधात असलेले लोक मूर्ख आहेत. आपण आता सर्वात श्रीमंत आणि आदरणीय देश आहोत. ज्या ठिकाणी जवळपास कोणतीही महागाई नाही आणि शेअर मार्केटमध्ये देखील चारशे एक हजार डॉलर्सचा विक्रमी उच्चांक आहे. लवकरच आपण आपलं 37 ट्रिलियन डॉलर कर्ज फेडण्यास सुरुवात करू. त्याचबरोबर सध्या अमेरिकेमध्ये विक्रमी गुंतवणूक, सर्व ठिकाणी कारखाने वाढत आहेत. त्यामुळे आता आपण उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना वगळून प्रत्येक व्यक्तीला किमान दोन हजार डॉलर म्हणजेच दीड लाख रुपये लाभांश दिला जाणार आहे.
ट्रम्प यांचा अजब फतवा!
ट्रम्प यांनी टॅरिप लावून अनेक देशांना वेठीस धरलं असताना त्यामध्ये त्यांनी आता मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी एक अजब फतवा काढला आहे. आता मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना अमेरिकेमध्ये एन्ट्री दिली जाणार नाहीये. ट्रम्प प्रशासनाने याबाबत दूतावास आणि वकिलातींना याबाबत आदेश जारी केले आहेत.
