व्हेनेझुएलानंतर ट्रम्पची या पाच देशांवर वक्रदृष्टी! एक देश थेट ताब्यात घेण्याचा प्लानही तयार
Donald Trump यांची वक्रदृष्टी पाच देशांवर पडली आहे. या राष्ट्रांमध्ये अमेरिकन सैन्य घुसवून राष्ट्रपतींना ताब्यात घेऊन ताबा घोषित करणार आहे.
Donald Trump will Attack on Five Countries after Venezuela Plan too Ready : व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता आणखी पाच देशांवर पडली आहे. तसेच या पाच राष्ट्रांमध्ये अमेरिकन सैन्य घुसलं तर ते राष्ट्रपतींना ताब्यात घेऊन या देशांवर अमेरिकेचा ताबा असल्याचं घोषित करणार आहे. जेणे करून कुणीही काहीही आक्षेप घेणार नाही. या पाचही देशांवर ताबा मिळवण्याचा पूर्ण प्लान देखील तयार आहे. व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी पडलेले हे पाच देश नेमके कोणते? या देशांवर ट्रम्प का हल्ला करणार आहेत? त्यातून ट्रम्प आणि अमेरिकेला काय मिळणार आहे? ज्यासाठी ते अनेक दिवसांपासून प्लानिंग करत आहेत. जाणून घ्या सविस्तर…
मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढली! तांबोळी आणि निस्तानेंच्या रूपाने भाजपने खेळले ‘एज्युकेशन कार्ड’
व्हेनेझुएलानंतर ज्या देशावर ट्रम्प हल्ला करणार आहेत त्यातील पहिलं नाव आहे. ग्रीनलँड व्हेनेझुएलावर हल्ला करण्याअगोदर दोन आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी म्हटलं होतं की, ग्रीन अँड फॅमिलीच्या दृष्टीने सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घ्यायला हवं त्यासाठी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर त्यांचे जवळचे नेते आणि ट्रम्प प्रशासनातील डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांच्या कैटी मिलर पत्नी यांनी 3 जानेवारी च्या रात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये ग्रीनलँडचा नकाशा अमेरिकेच्या झेंड्याच्या रंगामध्ये होता. ज्यावर इंग्रजीमध्ये लिहिलं होतं की, सून
या पोस्टवरग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ़्रेडरिक नील्सन यांनी ही पोस्ट अपमान जनक असल्याचं म्हटलं. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी चार जानेवारी रोजी जेव्हा ट्रम्प एयरफोर्स वनमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ग्रीनलँडच्या बाबतीतील 22 डिसेंबरला केलंलं विधान पुन्हा एकदा केलं आणि म्हटले की युरोपीय संघाला देखील ही माहिती आहे की अमेरिकेला सुरक्षेसाठी ग्रीनलँड पाहिजे.त्यामुळे अमेरिका आता ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी सैन्याला पाठवू शकते. मात्र हे इतकं सोपं नाही कारण ग्रीनलँड अद्यापही डेन्मार्कचा भाग आहे. त्यामुळे ट्रम्प यांना यासाठी डेन्मार्कचा सामना करावा लागेल.
दुसरीकडे याच चर्चेदरम्यान एअर फोर्स वनमध्येच त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता की, अमेरिका कोलंबियावर देखील मिलिटरी ॲक्शन प्लॅनिंग करत आहे का? त्यावर ट्रम्प यांनी म्हटलं होतं की हे ऐकून चांगलं वाटतं.त्यामुळे हे स्पष्ट आहे की, ग्रीनलँडनंतर अमेरिकेच्या हल्ला कोलंबियावर होणार आहे. दरम्यान यावर ट्रम्प म्हणाले होते की, व्हेनेझुएला आणि कोलंबिया अत्यंत आजारी राष्ट्र आहेत आणि आजारी माणूस कोकेन बनवणं पसंत करतो आणि ते अमेरिकेला विकला जातं त्यामुळे मी हे आणखी काळ चालू देणार नाही.
विधानसभेतील ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्याचा भाजपलाच विसर?; अकोटमध्ये ओवैसींच्या एमआयएमशी युती
यासोबतच पुढचा देश आहे तो म्हणजे क्यूबा त्याला ट्रम्प त्यांनी उघड धमकी दिली आहे ते म्हटले आहे की क्युबा दिवाळीखोर होणार आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या कोणताही मार्ग नाही. कारण त्यांची सर्व कमाई ही व्हेनेझुएलाकडून मिळणाऱ्या तेलामुळे होती. हे सर्व आता संपलं आहे. त्यामुळे या ठिकाणी अमेरिकन सैन्याने जाण्याची देखील गरज नाही ते स्वतःच संपले आहेत.
Video : फडणवीसांना डिवचलं, पुण्याचं लवकर वाटोळं होईलचा इशारा अन्…; ठाकरे बंधूंनी तोफ डागली
म्हणजेच ट्रम्प यांच्या पाच राष्ट्रांच्या यादीमध्ये किंवा हा एक देश आहे. जर क्युबा हा खरंच व्हेनेझुएलावर हल्ला झाल्याने स्वतःच नष्ट झाला तर ठीक नाहीतर ट्रम्प त्याला नष्ट करायला तयारच आहेतच. हे स्पष्ट आहे. त्यानंतर आणखी एक राष्ट्र आहे ते म्हणजे मेक्सिको हे जगभरात ड्रग्ज कार्टेलसाठी बदनाम आहे. त्यामुळे मेक्सिकोकडून जर अमेरिकेमध्ये ड्रग्ज येत असेल तर वॉशिंग्टन देखील ॲक्शन घेईल असे अगोदरच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कोलंबिया क्युबा आणि मेक्सिकोवर ट्रम्प केव्हाही हल्ला करू शकतात. कारण त्यासाठी त्यांच्याकडे कारण देखील आहे.
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; फडणवीसांकडून विरोधकांना प्रत्युत्तर
तसेच यासह इतरही काही राष्ट्रांवर ट्रम्प यांची नजर आहे. त्यांच्यावर हल्ला केल्यास जगामध्ये प्रचंड मोठे बदल होतील जे ट्रम्प यांना देखील आपेक्षित नसतील. त्यात आहे इराण येथे सुरू असलेल्या ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खमेनेईंविरूद्धच्या या आंदोलनावर तेहरानने हत्यारं वापरली तर अमेरेका या कडवं उत्तर देणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर मध्य पुर्व अशियातील देश इराणला पाठिंबा देतील चीन आणि रशियाचा पाठिंबा इराणला मिळेलं तर अमेरिकेला इस्त्रायल आणि इतर राष्ट्रांचा पाठिंबा मिळेल. त्यामुळे हे युद्ध इराण अमेरेका असं न राहता संपूर्ण जग यामध्ये उतरेल. असा धोका निर्माण झाला आहे.
