Video : फडणवीसांना डिवचलं, पुण्याचं लवकर वाटोळं होईलचा इशारा अन्…; ठाकरे बंधूंनी तोफ डागली

Uddhav Thackeray Raj Thackeray Interview राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये.

  • Written By: Published:
Video : पुण्याचं लवकर वाटोळं होईल; फडणवीसांनाही डिवचलं, ठाकरे बंधुंच्या मुलाखतीनं वेधलं लक्ष

Uddhav Thackeray Raj Thackeray Interview Teaser : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंची युती झाली आहे. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर लाँच करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 8 आणि 9 जानेवारीला प्रकाशित होणार आहे. त्याआधी ठाकरे बंधूंच्या या मुलाखतीचा पहिला टीझर संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या मुलाखतीदरम्यान ठाकरेंनी फाडणवीसांच्या भूमिकांवर सडकून टीका करत विविध कळीच्या मुद्द्यांवर थेट भाष्य केले आहे.

मनपा प्रचारात सावरकरांची एंन्ट्री; शेलारांची ठिणगी, मिटकरींचा भडका, मुख्यमंत्र्यांची फुंकर, अजितदादांचा सावध पवित्रा

फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नये

फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ‘ही करप्शन व कन्फ्युजनची युती आहे’ असे राऊतांनी विचारले त्यावर “भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) परखड मत व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राज्यात सत्तेत बसवलेली माणसं आहेत सगळी, यातला बसलेला कुणीच नाहीये आणि बसवलेला माणूस फक्त धन्याचं ऐकतो”, असं म्हणत एका उत्तरादरम्यान राज ठाकरेंनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. Uddhav Thackeray Raj Thackeray Interview Teaser

मुंबईपेक्षा पुण्याचं लवकर वाटोळं होईल – राज ठाकरे 

का प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी मुंबई-पुणे या शहरांमधील बकाल अवस्थेवर परखड भूमिका मांडली. “मुंबई बरबाद व्हायला एक काळ लोटला.. पण पुण्याला तेवढा वेळ लागणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल”, असं ते म्हणाले. “मुंबई आणि मुंबईकरांना काय हवंय, हे तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

मुंबईतील वाहतूक समस्या आणि इतर प्रश्न महेश मांजरेकरांनी उपस्थित केले. मी खरं सांगतो, मुंबईकर म्हणून मला आता घराबाहेर पडताना लाज वाटते, असं महेश मांजरेकर म्हणाले. तसेच 10 मिनिटांच्या अंतरासाठी आता 1 तास लागत असल्याचं देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. यावर मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, मात्र पुण्यात असं होणार नाही. पुणे लवकरात लवकर बरबाद होईल, असा सावध इशारा राज ठाकरेंनी दिला.

70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही; मागची पानं चाळली तर… बावनकुळेंचा अजितदादांना थेट इशारा

ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली, असं संजय राऊत प्रश्न विचारताना दिसत आहे. तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी या सगळ्यांचे खटाटोप सुरु आहेत, असा दावा राज ठाकरेंनी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. मदतीसाठी मनसे पण मतांसाठी नाही या तक्रारीवर भाष्य केलं. सरकारकडून निराशा झाल्यास जनता राज ठाकरेंकडे येईल, असं राऊत म्हणाले असता त्यावर आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार?” असे राज ठाकरे म्हणाल्याचे दिसत आहे. राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, मुंबईतील समस्या समजण्यासाठी मुंबईत जन्माला आल्याशिवाय कळणार नाही, असं राज ठाकरे सांगतना दिसून येत आहे.

follow us