दिल्लीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच पाकिस्तानही हादरले, इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट, 9 मृत्यू
दिल्लीनंतर पाकिस्तानमध्येही स्फोट, या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्री दिल्लीत स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानमधूनही (Pak) स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी
कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे आणि प्राथमिक तपास सुरू केला आहे.
सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, हा स्फोट सिलिंडरच्या स्फोटामुळे झाला आहे. मात्र सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत, स्फोटाचं नेमकं कारण आणि इतर गोष्टींचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर कोर्ट परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सर्व न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आलं आहे आणि पोलिसांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे.
