अजितदादांना धक्का; कोकाटेंचे समर्थक शिंदेंच्या शिवसेनेत, नगराध्यक्षपदासाठी नावंही घोषित…

अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला असून मंत्री माणिक कोकाटे यांचे समर्थक नामदेव लोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केलायं.

Untitle (20)

Ajit Pawar Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांचे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोंढे यांनी प्रवेश करताच त्यांना सेनेकडून एबी फॉर्म आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. लोंढे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला हा नाशिकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.

BCCI ची मोठी घोषणा, मिनी लिलावाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी 10 संघ खर्च करणार तब्बल 237.55 कोटी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे, कारण नामदेवराव लोंढे हे माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू समजले जातात.

बालकाने पालकाला शिकवू नये; विजयसिंह पंडितांचा योगेश क्षीरसागरांना टोला

नामदेवराव लोंढे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करत एबी फॉर्म देण्यात आला आहे. दरम्यान भगूरनंतर सिन्नरमध्येही शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. नामदेवराव लोंढे यांनी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला, त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत तातडीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला

follow us