बालकाने पालकाला शिकवू नये; विजयसिंह पंडितांचा योगेश क्षीरसागरांना टोला
योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यावरून विजयसिंह पंडिंतांची टोलेबाजी.
नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येत असतानाच (Beed) बीडमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे.त्यावर आता राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत श्वास गुदमरत होता. भाजपमध्ये प्रेवश केल्यावर मोकळा श्वास घेता येणार आहे अशी प्रतिक्रिया योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यावर प्रश्न विचारला असता, विजयसिंह पंडित म्हणाले, त्यांच्या श्वास बीड शहरातील अस्वच्छतेमुळे, धुळीमुळे आणि सर्वत्र तुंबलेल्या नाल्यांमुळे त्यांचा श्वास गुदमरला असेल असा टोला त्यांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
त्याचबरोबर अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु, त्यांच्याकडून काही अपेक्षित काम होत नाहीत अस क्षीरसागर म्हणाले. त्यावर बोलताना पंडित यांनी बालकाने पालकाला शिकवू नये असा जोरदार टोला लगावला आहे. त्याचबरोबर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यांच्यावर असं काही बोलण म्हणजे हास्यासपद आहे असंही ते म्हणाले.
योगेश क्षीरसागर काय म्हणाले?
आगामी काळात बीड तालुक्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा दृढ करण्यासाठी,संघटन बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करतो. बीड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकावा, यासाठी मी अखंड प्रयत्नशील राहणार आहे असं भाजप प्रवेशानंतर योगेश क्षीरसागर म्हणाले आहेत.
