बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
बीड जिल्ह्यात सध्या पक्षांतराचं वार वाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर (Beed) अनेक कार्यकर्ते आणि माजी आमदार इकडून तिकडे जाताना आपल्याला दिस आहेत. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश केला. धोंडे यांची ओळख भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कट्टर विरोधक व मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून आहे.
आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे भीमराव धोंडे हे कडवे विरोधक आहेत. तसंच, मंत्री पंकजा मुंडे यांचे ते समर्थक मानले जातात. धोंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतही काम केलेलं आहे. सध्या बीड जिल्ह्यात धस विरुद्ध मुंडे भावंडांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. ते पाहता धोंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा रस्ता का निवडला हे लक्षात येईलच.
ओबीसी प्रवर्गातून येणारे धोंडे यांनी महायुतीत बंडखोरी करत क्विषांधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांच्याविरुद्ध लढत देत दुसऱ्या क्रमांकावर राहून तब्बल ६५ हजार ५३५ मते घेतली होती. विधानसभेत निवकाल लागताच विजयी झालेले भाजप उमेदवार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जाहीरपणे घणाघाती टीका केली होती. पंकजा मुंडे यांनी धोंडे यांना छुपी मदत केल्याचा थेट वार धस यांनी केला आणि पुन्हा धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष पेटला.
Video: पंकजा मुंडे यांच्या सभांमुळेच माझा पराभव; भीमराव धोंडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
पुढे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी फक्त जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आवाज उठवला. इतकच नाही तर विधानसभेतही त्यांनी यावरून सर्वांना आवाक करून टाकेल असं भाषण केलं. त्यामुळे धस आणि मुंडे भावंड असा हा संघर्ष अधिक तीव्र होईल असं वाटत होतच. पुढे धस हे वारंवार बोलत आणि आरोप करत राहिले. शेवटी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
गेवराईचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केल्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा फायदा झाला आहे. पंडित यांनी रविवारी परळी येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.
दोन्ही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राहिलेले कुंडलिक खांडे यांनीही मंगळवारीच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. क्षीरसागर घराण्यातील तरूण नेते हेमंत क्षीरसागर हेही सत्ताधारीपैकी एका प्रमुख पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हेमंत क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू आहेत.
दोन दिवसांपूर्वी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची प्रमुख उपस्थिती होती.
