Video: पंकजा मुंडे यांच्या सभांमुळेच माझा पराभव; भीमराव धोंडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Bhimrao Dhonde Exclusive : महायुतीमध्ये काही ठिकाणीमैत्रीपूर्ण लढती झाल्या. तर काही ठिकाणी बंडखोरी झाली. ती बंडखोरी मागं घेण्यात महायुती म्हणून कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. अशी बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढत आष्टी मतदारसंघात घडली. येथे भाजपकडून सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे तर भाजपचे बंडखोर (Bhimrao Dhonde ) भिमराव धोंडे निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीत अखेर भाजपचे सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. मात्र, लढत झाली ती विद्यमान आमदार नाही तर बंडखोर भिमराव धोंडे यांच्यासोबत. या सर्व घडामोडींवर भिमराव धोंडे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना भिमराव धोंडे म्हणाले माझ्यावर आरोप केला जातो की मला मुद्दाम उभा केलं. तसंच, पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप केला गेला की, त्यांनी भाजप उमेदवाराचं नाही तर अपक्ष म्हणून माला छुपा पाठिंबा दिला होता. परंतु, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. याउलट पंकजा मुंडे यांच्या आष्टी मतदारसंघात दोन सभा झाल्या. त्या सभांमुळेच माझा पराभव झाला असा थेट आरोपच भिमराव धोंडे यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी जर या दोन सभा टाळल्या असत्या तर आजचा निकाल काही वेगळा लागला असता असा दावाही भिमराव धोंडे यांनी केला आहे. कारण, पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभांमुळे अनेक ओबीसी समाज दुभंगला गेला असंही धोंडे यावेळी म्हणाले आहेत.
पंकजाताई, तुम्ही असं करायला नको होतं; विजयी होताच सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर थेट घणाघात
मतांममध्ये इतकी तफावत कशी? या प्रश्नांवर बोलताना धोंडे म्हणाले, खरतर मला या निकालावच शंका आहे. सध्या राज्यभरात ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे मलाही त्यावर शंका आहे. कारण मला जे मताधिक्य पडलं आहे ते इतकं कमी कसं असेल असा प्रश्न मला पडलेला आहे. इथ माझी काही हक्काची मत आहेत आणि त्यामध्ये ओबीसी मतांची साथ मला मिळाली असती तर मी विजयापर्यंत पोहचलो असतो. परंतु, तसं झालं नाही असंही धोंडे यावेळी म्हणाले. तसंच, त्यांनी पक्षातीलच उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या मतांवरही भाष्य केलं आहे. कारण त्यांना इतकं कमी मत कसं पडू शकत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ओबीसी मत वळली नाहीत का? या प्रश्नावर धोंडे म्हणाले, सार्वजनिक पातळीवर पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. त्या जाहीर सभेत त्यांनी सुरेश धस यांना मत देण्याचं सांगितलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी मत हे धस यांच्या बाजुने गेले. तोच खरा माझा घात ठरला. तिथच मला पराभव स्वीकारावा लागला असंही धोंडे म्हणाले आहेत. तसंच, कुणी म्हणत असेल की मला पंकजा मुंडे यांनी मदत केली तर तसं नसून त्यांच्या सभांमुळे माझा पराभव झाला असा थेट घणाघात भिमराव धोंडे यांनी केला आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या आरोपांनंतर धोंडे यांनी पंकजा मंडे यांच्यावर आरोप केल्याने नक्की खर काय हे पंकजा मुंडे बोलल्यानंतरच समोर येईल हे नक्की.