अजित पवारांचं निधन, बॅनर-फटाक्यांबाबत भाजपचा मोठा निर्णय! तुरुंगातून आंदेकर सासू-सुनाही येणार
BJP पुणे मनपाची निवडणूक झाल्यानंतर महापौरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर महापौर उपमहापौर पदाची निवडणूकीसाठी अर्ज आले आहेत.
Ajit Pawar’s death, BJP’s decision regarding banners fireworks! Andekar’s also come from jail : पुणे महानगपपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर पुणे महापालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूकीसाठी अर्ज आले आहेत. अगोदर ही निवडणूक बिनविरोध होणार होती. काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या नागपूरे आणि लांडगेंचा सामना होणार आहे.
पुणे महापालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध नाही
काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. समविचारी पक्षांना आम्ही विचारणा केली होती आम्ही वाट पहिली मात्र कोणीही सोबत आलं नाही. आम्ही निवडणुकीत देखील सांगत होतो घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत तेच आज पुन्हा सिद्ध झालं, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची प्रतिक्रिया
आता आपली भेट होणार नाही…; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला अजितदादांशी शेवटचा संवाद
या निवडणुकीसाठी तुरूंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलवला जाणार आहे. नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार आहे. त्यासोबत सभेची कार्यपत्रिका देखील पाठवली जाणार आहे. त्या सभेसाठी असणारे विषय कार्यपत्रिकेत असणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर सर्वसाधारण सभेला हजर राहण्यासाठी पत्राचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडं जाणार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी सगळंच सांगितलं
9 तारखेला पहिली सर्वाधारण सभा होणार आहे. या सभेत महापौर उपमहापौर पदासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व 165 नगरसेवकांना उपस्थित राहणे बंधनकारक असते त्याच अनुषंगाने तुरुंगात असणाऱ्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना पक्षाकडून पत्र पाठवले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून पत्र पाठवल्यानंतर महापालिका नगरसचिव कार्यालयाकडून देखील या दोघींना उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवले जाणार आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या कोल्हापूर जेल मध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे भाजपचा मोठा निर्णय!
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. महापौर व उपमहापौर निवडीचे फटाके उडवू नका गुलाल उडवू नका अशा सूचना भाजपाकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. तसेच कुठल्याही पद्धतीचे बॅनर किंवा फटाके लावू नका. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या सूचना दिल्या आहेत.
