राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडं जाणार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी सगळंच सांगितलं

अजूनही अजित पवारांचा चेहरा डोळ्यासमोर येतो, दादा आपल्यात आज नाहीत यावर विश्वास बसत नाही अशा शब्दांत प्रफुल पटेल यांनी आठवण काढली.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 03T143255.636

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (Pawar) बारामतीत अजित दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे अस्थीकलश सर्वच जिल्ह्यात पाठवले जात असून राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व देऊ हा सगळ्यांचा आग्रह आहे.

सर्वांनी म्हटलं की सुनेत्रा पवार ह्याच आपल्या पक्षाच्या नेत्या राहतील. तर, तीन दिवसांचा शोक पाळणे ही पवार कुटुंबाची परंपरा, त्यामुळे चौथ्या दिवशी आम्ही शपथविधी केला, असं म्हणत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल, अस स्पष्ट केल. तसच, घाईघाईने शपथविधी का केला, याचही स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अजित दादांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द

अजित दादा आणि मी एकत्रच राजकारणात आलो, 1991 साली पहिल्यांदा दादा आणि आम्ही राजकीय सुरुवात केली. मात्र, दुर्दैवी घटनेमुळे आज अजित दादा आपल्यात नाहीत. अजूनही अजित पवारांचा चेहरा डोळ्यासमोर येतो, दादा आपल्यात आज नाहीत यावर विश्वास बसत नाही. 15 दिवसांपुर्वी मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा झेडपी इलेक्शन्सची तयारी सुरू होती. प्रफुलभाई आता आपली भेट होणार नाही, मी सात-आठ दिवस झेडपीच्या दौऱ्यावर असेन त्यांचं हे पहिलं वाक्य मी अजूनही विसरू शकत नाही, अस म्हणत प्रफुल पटेल यांनी अजित दादांची शेवटची आठवण सांगितली.

1991 मध्ये आम्ही दोघं एकत्र राजकारणात आलो, गेली कित्येक वर्षं आम्ही एकत्रच काम केलं. अजित पवारांनी आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार मोठ्या हिमतीने पार केले. जेव्हा 2023 मध्ये आम्ही मोठा निर्णय घेतला तेव्हा आम्ही एकत्रित पद्धतीने सगळी आव्हानं पेलली. मात्र, त्यानंतर आता जेव्हा आम्ही आणखी पुढे जाण्याचा निर्णय घेणार होतो, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. हा संपूर्ण परिवार राष्ट्रवादीचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. अजित पवारांची जी काम करण्याची पद्धत आहे, ती तशीच पुढे चालू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे असंही ते म्हणाले.

follow us