धक्कादायक! दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानी नागरिकांची गूगल सर्च हिस्ट्री समोर; पाहा संपूर्ण लिस्ट

Pakistani citizens Delhi blast या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना गूगरवर काय सर्च केलं याची एक धक्कादायक यादी समोर आली आहे.

Pakistani Citizens Delhi Blast

Google search history of Pakistani citizens exposed after Delhi blast See complete list : सोमवारी सायंकाळी 6.55 मिनिटांनी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट झाला. (Delhi)देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे हा हल्ला आत्मघातकी असू शकतो असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना गूगरवर काय सर्च केलं याची एक धक्कादायक यादी समोर आली आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानी नागरिकांची गूगल सर्च हिस्ट्री समोर…

भारताला हदरवून टाकणाऱ्या या हल्ल्याच्या बातम्या जगभरातील अनेक देशांतील माध्यमांनी दिल्या आहेत. त्यात पाकिस्तानच्या माध्यमांनी देखील ही बातमी कव्हर केली. यावर पाकिस्तानची माध्यम संस्था डॉनने लिहिलं की, दिल्लीच्या गर्दीच्या भागामध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली पोलीस प्रवक्ते संजय त्यागी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. या बातमीनंतर पाकिस्तानी नागरिकांना गूगरवर काय सर्च केलं याची एक धक्कादायक यादी समोर आली आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये या हल्ल्यासंबंधित काही सर्च ट्रेडिंगला आले आहेत.

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मंत्री हसन मुश्रीफ यांनी उघड केले ‘एकजुटी’चे रहस्य

यामध्ये पाकिस्तानी युजर्सने हल्ल्यासंबंधित माहिती सर्च केली आहे. जसे की, हा हल्ला कसा झाला? किती नुकसान झालं? तसेच तपास कशा पद्धतीने सुरू आहे? अशी माहिती पाकिस्तानी युजर्सने हल्ल्यासंबंधित सर्च केली आहे. तसेच पाकिस्तानच्या एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉ़र्मवर देखील या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दिल्ली ही ट्रेडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी

दिल्लीत घडलेल्या भीषण स्फोटपूर्वी पोलिसांनी श्रीनगरमध्ये लावलेल्या एका पोस्टरच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमध्ये घडवण्यात येणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळवून लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांनी अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या या मॉड्यूलमध्ये स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरापर्यंत एका पोस्टरच्या माध्यमातून पोलीस कसे पोहोचले त्याबद्दल जाणून घेऊया…

श्रीनगरच्या नौगाम भागात लावले होते पोस्टर

दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फरिदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्यानंतर विविध ठिकाणी काम करणाऱ्या काही डॉक्टरांचे दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीनगरच्या नौगाम भागात एक पोस्टर दिसून आल्यानंतर हे धक्कादायक वास्तव्य उघडकीस आले आहे.

follow us