श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना थेट रिमोट कंट्रोल म्हटले

श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना थेट रिमोट कंट्रोल म्हटले

Shrikant Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत कल्याण मतदारसंघातून (Kalyan constituency) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावरून भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena)रस्सीखेच सुरू होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिवसेना व भाजपमध्ये खटके उडू लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आठ ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु हक्काच्या कल्याणच्या जागेवर विद्यमाना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले नव्हते. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

यावेळी मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांना जास्त मतांनी निवडून आणू. भाजप, राष्ट्रवादी, आरपीआ, रासपा युती श्रीकांत शिंदेंना निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान श्रीकांत शिंदे यांची उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून न झाल्याने आता त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आज कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने चालत असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी एक ट्विट करत महायुतीची महाशक्ती भाजप आहे यात कधीच शंका नव्हती, त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निणर्याही भाजप घेताना दिसते. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली.

पंजाबराव डख यांच्याकडे फक्त 10 हजार रोकड, जाणून घ्या एकूण संपत्ती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज