Loksabha Election : भाजपने CM एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडूंचे टीकास्त्र

Loksabha Election : भाजपने CM एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडूंचे टीकास्त्र

Bachchu Kadu On BJP : भाजपसह महायुतीत (Mahayuti) सहभागी असणारे प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहेत. ते सातत्याने भाजपवर ( BJP) आणि भाजपच्या उमदेवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करत आहेत. आताही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपने एकनाथ शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, त्यांना कशी पध्दतीने मदत केली पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे, असं विधान कडू यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा होतेय.

Earthquake नंतर तैवान आगीतून फुफाट्यात; 30 लढावू विमानं पाठवत चीनची घुसखोरी 

आज माध्यमांशी बोलतांना कडू म्हणाले, भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पध्दतीने मदत केली पाहिजे. ते पाहिल्या गेलं पाहिजे, असं विधान कडू यांनी केलं. दरम्यान, यवतमाळ-वाशिमच्य उमदेवारीचा तिढा सुटत नाही. त्यावरही कडू यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, भावना गवळी यवतमाळ-वाशीममध्ये पाच वर्षे खासदार आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्यावं, हा त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेल.

Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती 

अमरावती लोकसभा मतदारसंघात कोणाची लाट नाही. एक मात्र, निश्चित आहे की, लोकांना आता नवनीत राणा नकोत. आमच्यासाठी अमरावती मतदारसंघाची लढत ही फक्त निवडणूक नसून जनआंदोलन आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. नेते लाचार आहेत, पण कार्यकर्ते लाचार झालेले नाहीत. आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बूब यांना निवडणून आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार कडू यांनी व्यक्त केला.

बूब यांनी शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी दिली आङे. शेतकरी, मजूर, व्यापारी यांची दुकाने बंद करण्याची व्यवस्था पुढच्या पाच वर्षात सरकार करेल. किराणा आणि कापड उद्योग बंद झालेले दिसतील. ती अवस्था आमच्यावर येऊ नये, म्हणून दिनेश बूब यांना संसदेत पाठणार आहोत, असं कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आशिष शेलार यांना विचारले असता त्यांनी स्वत:च्या पक्षावर लक्ष केंद्रित करावे, असं उत्तर दिलं. बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्व मित्रपक्षांनी मजबुतीने मुख्यमंत्रीपदावर बसवलं, असं शेलार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube